Pune PMP Bus Stolen: बापरे! चोरट्यांनी पळवली PMP बस; पुण्यात खळबळ

Pune PMP Bus Stolen By Thieves: मार्केट यार्ड परिसरात बस सोडून चोरटा पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
Pune Crime
Pune CrimeSaamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी....

Pune News: पुणे शहरातून पी. एम पी बस चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालखी सोहळ्यामुळे ही बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने पीएमपी बस पूलगेट आगारात न लावता सारसबाग परिसरात लावण्यात आली होती. बसमध्ये चावी असल्याचे पाहून चोरट्याने चक्क बस पळवून नेली आहे.

मार्केट यार्ड परिसरात बस सोडून चोरटा पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. चोरट्याने बसमधील पाच हजारांची बॅटरी चोरून नेल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime
Viral Video: रेल्वे कर्मचाऱ्याला लागला शॉक अन् काही सेकंदात झाली राख; काळजाचा थरकाप उडवणारी घटना CCTV त कैद...

याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की, पीएमपीच्या (PMPL) स्वारगेट आगारातून धावणाऱ्या बस लष्कर भागातील पूलगेट स्थानकात; तसेच स्वारगेट भागात लावण्यात येतात. पालखी सोहळ्यामुळे पूलगेट स्थानकात बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने एका चालकाने रात्री बस सारसबाग परिसरातील सणस मैदान परिसरात लावली होती.

चावी बसमध्ये होती. चोरट्याने बसमध्ये चावी असल्याचे पाहून मध्यरात्री बस चोरून नेली. याबाबत पीएमपीच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News)

Pune Crime
BRS Nagpur News: देशात उच्च दर्जाचा बदल हाच पक्षाचा उद्देश! सत्तापरिवर्तनासाठी के चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्रातून एल्गार

पीएमपी बस मार्केट यार्ड आगाराच्या परिसरात बस लावून चोरटा पसार झाला. पसार झालेल्या चोरट्याने बसमधील बॅटरी चोरून नेली. दरम्यान, बस चोरीस गेल्याचे बुधवारी (१४ जून) लक्षात आल्यानंतर शोध घेण्यात आला. तेव्हा बस मार्केट यार्ड आगाराजवळ लावण्यात आल्याचे आढळून आले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com