mamata banerjee
mamata banerjee 
देश विदेश

भवानीपूरात ममता बॅनर्जींची 'दीदीगिरी'; विक्रमी मतांनी विजय

वृत्तसंस्था

यंदाच्या निवडणुकीत ममतांनी स्वतःचा विक्रम मोडला आहे. भवानीपूरमधील त्यांच्या पूर्वीच्या विजयाच्या पेक्षा त्यांनी जास्त मते मिळवली आहेत. सन २०११ च्या पोटनिवडणुकीत त्यांनी ५२ हजार २१३ मतांनी आणि सन २०१६ मध्ये २५ हजार ३०१ मतांनी विजय मिळवला होता.

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर भवानीपूरमधून निवडणुक लढविणा-या ममता बॅनर्जी mamata banerjee यांनी आज विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांचा पराभव केला. एकूण २१ फेऱ्यानंतर या पाेटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांचा ५८ हजार ८३२ मतांनी पराभव केला. यासह ममता बॅनर्जीने भवानीपूर येथून हॅटट्रिक साधली आहे. west-bengal-bhabanipur-by-election-mamata-banerjee-won-by-record-votes-bjp-candidate-priyanka-tibrewal-defeated-sml80

यापुर्वी ममता बॅनर्जी यांनी दोन निवडणुकांमध्ये त्यांच्या हक्काच्या भवानीपूरमधून विजय मिळविला हाेता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवली. त्यांना शुभेंदू अधिकारी यांनी पराभवचा धक्का दिला. परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपला इंगा दाखवित ममतांच्या टीएमसीने २१३ जागा जिंकत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार ठरल्या.

भवानीपूर, समशेरगंज आणि जंगीपूर या तीन जागांवर पोटनिवडणूक लागली हाेती. त्यासाठी मतदान झाले. आज मतमाेजणीस प्रारंभ झाला. २१ फे-यांअखेर ममता बॅनर्जी यांनी ५८ हजार ८३२ मते तसेच भाजपच्या प्रियंका तिब्रेवाल यांना २६ हजार ३२० मते मिळाली आहेत.

भवानीपुरीतील विजयाने या दोन्ही विधानसभा जागांवर तृणमूल आघाडी कायम आहे. ममता बॅनर्जींच्या विजयाच्या समीप येताच कालीघाट येथील त्यांच्या कार्यालयासह राज्यातील विविध भागात जल्लाेष सुरू झालेला आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विजयी मिरवणूक काढू नये असे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात पावले उचलली आहेत. ममता बॅनर्जींनी देखील कार्यकर्त्यांना विजयाची मिरवणूक काढू नका अशी सूचना दिली आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Video: 48 पैकी 49 जागाही Uddhav Thackeray जिंकून आणू शकतात! देवेंद्र फडणवीसांच्या विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ

Akola Accident: देव तारी त्याला कोण मारी! ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारमधील सर्वजण सुखरुप

Devendra Fadnavis: भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट का कापले? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT