Mamata Banerjee news Saam tv
देश विदेश

West Bengal Next CM: पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? ममता बॅनर्जींच्या एकेकाळच्या विश्वासू नेत्याचं नाव आघाडीवर

West Bengal Assembly Election Result: पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी ममता बॅनर्जींच्या एकेकाळच्या विश्वासू नेत्याचं नाव आघाडीवर आहे.

Priya More

Summary -

  • पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला

  • पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय

  • टीएमसीचा मोठा पराभव झाला

  • शुभेंदू अधिकारी मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव करून सत्ता मिळवण्यात भाजपला यश आले आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या आघाडीमुळे राज्याच्या राजकारणात एका नवा अध्यायाला सुरूवात झाली आहे. भाजपने १९८ जागांवर बाजी मारली. तर टीएमसीला अवघ्या ८९ जागांवर यश मिळाले आहे. भाजपच्या यशानंतर आता पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात सर्वात जास्त चर्चेत असलेले नाव म्हणजे शुभेंदू अधिकारी आहे.

एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सर्वात जास्त विश्वासू सहकारी असलेले शुभेंदू अधिकारी हे आता त्यांचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये शुभेंदू अधिकारी यांचे पारडे जड आहे. भाजपची सत्ता आल्यावर शुभेंदु अधिकारी मुख्यमंत्री असतील असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान केले होते.

गेल्या काही वर्षांत शुवेंदू अधिकारी यांनी स्वतःला भाजपचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून प्रस्थापित केले. ते सनातन धर्माच्या संरक्षणाची उघडपणे बाजू घेतात आणि ममता बॅनर्जी सरकारच्या राजकारणावर टीका करतात. शुवेंदू अधिकारी हे एकमेव नेते आहेत जे ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर थेट टीका करतात.

शुवेंदू अधिकारी एकेकाळी ममता बॅनर्जी यांना आपले गुरू मानत होते. पण आता ते अमित शाह त्यांचे राजकीय मार्गदर्शक बनले आहेत. अमित शाह यांच्यासोबत व्यासपीठावर येण्यापासून ते रणनीती आखण्यापर्यंत शुवेंदू अधिकारी हे नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. अमित शहा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सतत एकच गोष्ट सांगितली की, पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री इथलाच सुपुत्र होईल. शुवेंदू अधिकारी स्वतःला पूर्व मेदिनीपूरचा भूमिपुत्र म्हणतात आणि ममता बॅनर्जींच्या बाहेरचा असल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी स्वतःला बंगाली अस्मितेचा रक्षक असल्याचे सांगतात.

शुवेंदू अधिकारी हे भाजपचे फक्त धडाडीचे नेते नाहीत तर ते कुशल संघटकही आहेत. मेदिनीपूरपासून उत्तर बंगालपर्यंत पक्षाची संघटनात्मक रचना मजबूत करण्यात त्यांची भूमिका महत्वाची राहिली. पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने अद्याप अधिकृतपणे कोणाच्याही नावाची घोषणा केली नाही. शुवेंदू अधिकारी यांच्याह पक्षात दिलीप घोष यांच्यासारखे इतरही दिग्गज नेते आहेत. पण अमित शहा यांनी प्रचार सभांमध्ये शुवेंदू अधिकारी याचे नाव घेतले त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचेच पारडे जड वाटत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati rahuri bypolls election results: आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात कळंबमध्ये भव्य मोर्चा

Actors Who Become CM: चित्रपटातून थेट राजकारणात; थलापती विजय यांच्यासारखेच 'हे' कलाकार बनले मुख्यमंत्री

Summer Hair Care: कडाक्याच्या उन्हामुळे केस चिकट होतात? डॉक्टरांनी दिले ७ घरगुती उपाय, केस होतील मऊ अन् शायनी

Ideal weight guide: वयोमानानुसार पुरुषांचं वजन किती असलं पाहिजे?

Milk Benefits Summer: उन्हाळ्यात दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक?

SCROLL FOR NEXT