viral wedding video Saam
देश विदेश

नवरी स्टेजवरून उतरली अन् नवरदेवासमोरच बॉयफ्रेंडला घातली माळ; लग्नाच्या मांडवात फिल्मी ड्रामा, पाहा व्हिडिओ

तुम्ही फक्त पिक्चरमध्येच नवरी पळून गेल्याचं पाहिलं असेल. मात्र मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये नवरा हार घालणार इतक्यात नवरीनं पळ काढला. नवरीनं दुसरा कोणताही विचार न करता स्टेजवरून थेट उडी मारली आणि समोरच उभा असलेल्या प्रियकराच्या गळ्यात वरमाळा घातलीय.

Namdeo Kumbhar

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही प्रतिनिधी

Wedding Incident in Madhya Pradesh Chhindwara : नवरदेवानं होणाऱ्या बायकोच्या गळ्यात हार घातला... मात्र नवरदेवाच्या हातावर तुरी देऊन नवी नवरी थेट मित्रसोबतच पसार झालीय. हा प्रकार नेमका कुठे घडला. एका लग्नाची ही अजब गोष्ट नेमकी काय आहे? (viral wedding video)

एखाद्या पिच्छरमधी तुम्ही बघितलं अस. नवरी मंडपातून आपल्या बॉयफ्रेंड संग पळून जाती... या सिनवर लय टाळ्या अन् शिट्ट्या पडत्यात पण असाच रिलमधला सीन रियल लाईफमधी घडलाय... ऐन मांडवामधनं नवरी फरार... एकदम एक दुजे के स्टाईल

मांडव सजला... वऱ्हाडी मंडळी जमली... लगीन होणार म्हणून नवरदेव हारकून गेला होता... मांडवात आता नवरा नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालणार हुतं...नवऱ्यानं नवरीच्या गळ्यात हार घातला पण नवरीच्या मनात दुसऱाच हुता... हीच टायमिंग म्हणून नवरीनं थेट स्टेजवरून उडी हाणली..अन् गर्दीतल्या दर्दी बॉयफ्रेंडला गाठला अन् गळ्यात हार घातला... झाला का नाय कुटाना

गडी हारकून गेलेला नवरदेव पार हिरमुसला...मांडवात पार तारांबळ उडली... वऱ्हाडीमंडळीचं टाळक सटकलं नाचणाऱ्या वऱ्हाड्यांनी राडा घातला...नवऱ्यानं लग्नास दणक्यात नकार दिला. मंगळसूत्र दागिनं अन् मोबाईल परत मागितला. झालेल्या अपमान सहन न झाल्यानं थेट वऱ्हाडी मंडळींनी पोलिसातच तक्रार केली... घटना छिंदवाड्याची हाय. असं म्हणत्यात प्रेमात अन् युद्धात सगळ माफ हाय.. पण एखादा मनात असतना दुसऱ्याला होकार देणं यात पाप हाय... असो झालं ते झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याची धुरा कोण सांभाळणार? बड्या नेत्याने थेट नाव सांगितलं

पावसाळ्यात पिंपल्स आणि ऑयली स्किनचा त्रास? फॉलो करा या 7 सोप्या टिप्स

Healthy fruit: सफरचंद नाही तर 'हे' 1 फळं खाऊन तुम्ही राहाल डॉक्टरांपासून दूर

Gold Price Today : आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी उसळी, मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या भाव ₹१,४४,९३० तोळा, वाचा ताजे दर

Maharashtra News Live Update: बीड पोलिसांना 112 वर खोटा फोन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT