Weather updates imd predicts heavy-rainfall in delhi uttarakhand himachal and maharashtra rain  Saam TV
देश विदेश

IMD Rain Alert: पुढील ४८ तासांत 'या' राज्यांमध्ये कोसळणार परतीचा पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Rain Alert News: सोमवारी देशातील काही राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीरला पावसाने चांगलंच झोडपून काढलं.

Satish Daud

Weather Update Today

यंदाचा मान्सूनचा हंगाम जवळपास पूर्णत: संपला असून आता काही ठिकाणी थंडी तर काही भागात उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. मात्र, जाता जाता अनेक भागात पावसाच्या सरी बसरत आहेत. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

सोमवारी देशातील काही राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीरला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. आता हवामान खात्याने पुढील २४ तासांतही या भागात पुन्हा मुसळधार पाऊस होईल, असा इशारा दिला आहे.

मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागातून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे येत्या १२ ऑक्टोबरपर्यंत देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) होण्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर या राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय सिक्कीम, पश्चिम बंगालसह, कर्नाटक, तामिळनाडूमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचरबरोबर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. केरळचा काही भाग आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

येत्या 48 तासांत मान्सून माघारी परतणार

हवामान खात्याने (Weather Updates) दिलेल्या माहितीनुसार, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, गंगेचा पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्रातील काही भागांमधून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत मान्सून माघारी परतणार आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून मान्सून पूर्णपणे बाहेर पडला आहे. तसे पाहता यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा २५ जून रोजी बसरला. सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाने चांगलाच जोर पकडला होता. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT