Maharashtra Weather Update Saam tv
देश विदेश

Weather Forecast: आजचे हवामान! ५ राज्यांना पावसाचा इशारा, तर १८ शहरावर दाट धुक्याचे सावट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Today’s Weather Forecast: देशात थंडीची लाट कायम असून हवामान विभागाने ५ राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. तर १८ शहरांमध्ये सकाळी व संध्याकाळी दाट धुक्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात गारवा कायम असून तापमानात चढ-उतार पाहायला मिळतोय.

Namdeo Kumbhar

today weather forecast in India : देशात सध्या थंडीची लाट पसरली आहे. कमान अन् किमान तापमानात मोठी घट झाली आहे. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्रासह देशात थंडीची लाट पसरली आहे. जम्मू काश्मीर ते दिल्ली अन् राजस्थान ते कोलकाता अन् केरळमध्येही हाडं गोठवणारी थंडी पडलेय. पण हुडहुडीच्या वातवारणातच हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाच राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय १८ शहरात सकाळी आणि संध्याकाळी दाट धुके पडू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. महाराष्ट्रात मात्र कमाल अन् किमान तापमानात घट झाल्याने गारवा वाढलाय. पहाटे कडाक्याची थंडी वाजत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पाच राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

कोणत्या ५ राज्यांमध्ये पावसाचा इशारा?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जम्मू आणि काश्मीर, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर आज पावसाची शक्यता आहे. या ठिकामी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वेगात हवा, वादळे आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलेय.

कोणत्या १८ शहरांमध्ये दाट धुक्याचा इशारा ?

देशात थंडीची लाट आली आहे, काही शहरात दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. धुक्यामध्ये वाहने जपून चालवण्याची सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. धुक्यामुळेच यमुना एक्सप्रेसवेवर मंगळवारी भयंकर दुर्घटना घडली होती. त्यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला होता. पुढील काही दिवसा १८ शहरांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बिहारमधील पाटणा, भागलपूर, पूर्णिया, गया, जहानाबाद आणि दरभंगा येथे दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज, कानपूर, लखनऊ, इटावा, बाराबंकी आणि सहारनपूर येथेही सकाळ अन् सायंकाळच्या वेळी दाट धुके पडू शकते. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मनाली येथील लोकांना दाट धुक्यापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये दाट धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय ? Maharashtra temperature update today

राज्यात सध्या थंडीची लाट ओसरली आहे. पण हवामानात गारवा कायम असल्याने हुडहुडी तशीच आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरी काही प्रमाणात कमी झाल्याने महाराष्ट्रातही थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळतोय. राज्यभरात गारठा आणखी काही दिवस कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोंदिया, अहिल्यानगर आणि जळगाव मध्ये ८.५ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान)

  • अहिल्यानगर: ८.५

  • पुणे: ९.४

  • जळगाव: ८.५

  • कोल्हापूर: १५.१

  • महाबळेश्वर: १२.१

  • मालेगाव: ९.२

  • नाशिक: ८.८

  • सांगली: १४.८

  • सातारा: १३.५

  • सोलापूर: १४.९

  • छत्रपती संभाजीनगर: १०.९

  • परभणी: ११.३

  • अकोला: ११.०

  • अमरावती: ११.३

  • बुलढाणा: १२.३

  • गोंदिया: ८.५

  • नागपूर: ९.६

  • वर्धा: १०.८

  • यवतमाळ: १०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra: वर्षभर शाळेतच नाहीत,७ शिक्षकांनी फुकटाचा पगार घेतला, महाराष्ट्रातील धक्कादायक वात्सव

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Mobile WiFi: घराबाहेर पडताच मोबाइलचा वायफाय बंद करा, अन्यथा डोकं झोडून घ्यावं लागेल! कारण काय?

Mulshi Crime: मुळशीत पाय ठेवायचा नाही, नाहीतर तुझा मुळशी पॅटर्न करेन; पुण्यातील व्यावसायिकाला धमकी

Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्ना पोहचला अलिबागला; घराची केली वास्तुशांती, VIDEO होताय व्हायरल

SCROLL FOR NEXT