Weather Update 23 March 2024  Saam TV
देश विदेश

Weather Forecast: होळीआधीच बदलला हवामानाचा रंग; येत्या २४ तासांत 'या' भागात कोसळणार पाऊस, वाचा वेदर रिपोर्ट

Weather Update Today: हवामान खात्याने पुढील २४ तासांत तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांना तुफान पावसाचा इशारा दिला आहे.

Satish Daud

Weather Update 23 March 2024

होळीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मात्र, त्याआधीच देशातील हवामानाने रंग बदलण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे उत्तर भारतात उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे दक्षिण भारतातील काही राज्यात सध्या तुफान पाऊस सुरू आहे. येत्या एक ते दोन दिवसांत पावसाचा जोर आणखीच वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हवामान खात्याने पुढील २४ तासांत तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांना तुफान पावसाचा इशारा दिला आहे. तर काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.  (Breaking Marathi News)

आयएमडीने २३ ते २६ मार्च दरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम आणि मेघालयमध्ये 23 आणि 25 मार्च रोजी मुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत पश्चिम हिमालयीन प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. ईशान्य भारतात एक किंवा दोन ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिशा, दक्षिण तामिळनाडू, केरळ, किनारी कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांना हिमवृष्टी तसेच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४ दिवसांत दिल्लीतील तापमानात मोठी वाढ होणार असून नागरिकांना उन्हाच्या झळा बसेल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

महाराष्ट्रातील हवामानाबाबत बोलायचं झाल्यास पुढील तीन ते चार दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. मुंबई-पुण्यात तापमानाचा पारा वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

Shahi Tukda Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा,वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT