Mumbai Local Train: होळीचा दिवस मुंबईकरांसाठी मनस्तापाचा; भरदिवसा मेगाब्लॉक, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Local Mega Block: ऐन होळीच्या दिवशी मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कारण, उद्या म्हणजेच रविवारी (२४ मार्च) रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
Mumbai Local Mega Block on Sunday
Mumbai Local Mega Block on SundaySaam TV

Mumbai Local Mega Block on Sunday

ऐन होळीच्या दिवशी मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कारण, उद्या म्हणजेच रविवारी (२४ मार्च) रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करणं गरजेचं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Local Mega Block on Sunday
Mumbai News: वडिलांचा PF काढून देतो, माझी ती इच्छा पूर्ण कर; कंपनीच्या मॅनेजरची तरुणीकडे शरीरसुखाची मागणी

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. (Breaking Marathi News)

याशिवाय ठाणे येथून धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. (Latest Marathi News)

हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर देखील रविवारी सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. यामुळे वाशी बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.

तसेच ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसेल. होळी सणानिमित्त पश्चिम रेल्वेने रविवारी ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Local Mega Block on Sunday
Thane News: तोतया पोलीस पथकाचा कुरियर व्हॅनवर दरोडा; ५ कोटी ४० लाख लुटले, शहापूर तालुक्यातील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com