Weather Update IMD rain prediction Maharashtra Madhya Pradesh Chhattisgarh South Tamil Nadu South Kerala in next two days Saam TV
देश विदेश

Weather Update: ऐन थंडीत बरसणार पावसाच्या सरी; महाराष्ट्रासह ७ राज्यांना अवकाळीचा इशारा

Maharashtra Weather Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या ५ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस (Heavy Rain) पडू शकतो.

Satish Daud

Rain Alert In Maharashtra

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरातून राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. विदर्भासह मराठवाड्यातील थंडीचा प्रादुर्भाव कमी होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशभरात सर्वच ठिकाणी हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण तयार झालं आहे. काही राज्यांमध्ये धुक्याचा प्रादुर्भाव देखील दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील विदर्भात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही खाली गेला. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली होती. मात्र, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात पुन्हा एकदा बदल घडून येत आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या ५ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस (Heavy Rain) पडू शकतो. येत्या दोन दिवसांत विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.

पुण्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, सोमवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. गोंदियातील तापमान १२.४ अंश सेल्सिअस इतके होते.

हवामान खात्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे. येत्या ५ जानेवारीपासून दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तरेकडील राज्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मंगळवार आणि बुधवारी हलका पाऊस पडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT