Monsoon Update
Monsoon Update Saam Tv
देश विदेश

Monsoon Update: 'या' राज्यांमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; आयएमडीचा इशारा

वृत्तसंस्था

Weather Latest Update: देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. देशात आणि राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. तसेच देशातील काही भाग अजूनही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतीची कामे करण्यास सुरवात केली आहे तर काही ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस (Rain) नसल्यामुळे शेतकामे ठप्पच आहेत.

भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात मान्सून पोहोचला आहे. अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र अनेक ठिकाणी अजूनही लोक पावसाची वाट पाहत आहेत. या सगळ्यामध्ये भारतीय हवामान केंद्राने विविध राज्यांतील पावसाची माहिती दिली आहे. दरम्यान, 20 ते 23 जुलै दरम्यान दिल्लीत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 20 जुलैपासून म्हणजेच आजपासून दिल्लीसह उत्तर भारतात पावसाचा जोर वाढणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हे देखील पाहा -

दिल्लीत आजपासून तीन दिवस पाऊस

IMD नुसार, आज दिल्ली NCR च्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत आजचे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किंमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. 20 ते 23 जुलैपर्यंत तापमान 31 ते 33 अंशांच्या आसपास राहील. त्याचवेळी 24 पासून पुन्हा एकदा उष्णता वाढण्याची शक्यता आहे. तापमान 35 अंशांपर्यंत पोहोचू शकते.

हवामान खात्यानुसार, आजपासून दिल्लीसह उत्तर भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. ते पुढील 4 ते 5 दिवस सुरू राहू शकते. असे सांगितले जात आहे की पुढील एका आठवड्यात दिल्ली जुलै महिन्यातील सरासरी पावसाचा आकडा गाठू शकते.

पावसामुळे शाळांना सुट्टी

त्याचवेळी, हवामान खात्याने वायव्य भारत, ईशान्य राज्ये आणि पश्चिम बंगालमध्ये पुढील 3-4 दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे देहरादूनमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हवामान खात्याने बुधवारी राज्यातील १३ पैकी नऊ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

राजस्थान आणि महाराष्ट्रात पावसाचा इशारा

त्याचवेळी राजस्थानच्या अनेक भागात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. तसेच मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane: मी सर्वात हुशार विद्यार्थी, अभ्यास करूनच पेपरला बसतो; नारायण राणे काय म्हणाले?

Viral Video Of Delhi Boy: वडील जग सोडून गेले, आईनेही वाऱ्यावर सोडले; १० वर्षांच्या जसप्रीतचा संघर्ष पाहून आनंद महिंद्रा मदतीला धावून आले

Cesar Luis Menotti Death: फुटबॉलच्या विश्वात कोसळला दु:खाचा डोंगर; फुटबॉल प्रशिक्षक रोमँटिक सेझर लुईस मेनोट्टीचं निधन

Live Breaking News : राजेंद्र गावित यांचा भाजप प्रवेश, पालघरमध्ये शिंदे गटाला धक्का

Rupali Chakankar On Rohit Pawar | रोहित पवारांच्या आरोपावर चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT