Ajit Pawar On Modi 3.0 Cabinet Saam Tv
देश विदेश

Ajit Pawar on Cabinet List: आम्हाला एक कॅबिनेटमंत्रीपद हवं, आम्ही काही काळ वाट पाहू: अजित पवार

NDA Goverment Cabinet Formation: आम्हाला एक कॅबिनेटमंत्रीपद हवं. आम्ही कॅबिनेट मंत्रिपदासाठी थांबायला तयार आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

Satish Kengar

''मला त्यांचा (भाजप नेतृत्वाचा ) फोन आला होता, मी त्यांना सांगितलं की, आम्हाला एक कॅबिनेटमंत्रीपद हवं. आम्ही कॅबिनेट मंत्रिपदासाठी थांबायला तयार आहोत. यासाठी आम्ही काही काळ वाट पाहू'', असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कॅबिनेट मंत्रीही शपथ घेणार आहेत. यातच एनडीएच्या मित्रपक्षातील काही खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र यात अजित पवार गटाच्या समावेश नसणार. यावरच पत्रकार परिषदेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ''दिल्लीतील बैठकीत मी त्यांना सांगितलं की, लोकसभा निवडणुकीत आमची एकच जागा आली असून राज्यसभेत आमची एक जागा आहे. असं असलं तरी दोन ते तीन महिन्यात आमच्या राज्यसभेच्या दोन जागा वाढत आहेत. हे आम्ही त्यांच्या (भाजप नेतृत्वाच्या) लक्ष आणून दिलं. यात आमचे एकूण खासदार चार होतील. यामुळे आम्हाला एक जागा मंत्रिमंडळात मिळायला हवी.''

ते म्हणाले, ''काल त्यांचा मला फोन आला, मी तिघांशीही बोलला. त्यांनी सांगितलं की, लोकसभेचा विचार करता तुमचा एक उमेदवार निवडून आला आहे. अनेक घटक पक्ष कमी संख्येने निवडून आले आहेत. मात्र एनडीएचे घटक पक्ष म्हणून आम्ही प्रत्येकाला मंत्रिमंडळात घेण्याचा प्रयत्न करतोय. यातच अनेक पक्ष असे आहेत, ज्यांचे उमेदवार निवडून आले नाहीत, मात्र त्यांचे राज्यसभेत खासदार आहेत. मात्र त्यांनाही आम्ही त्यांना कॅबिनेटमध्ये घेणार आहोत. पण कॅबिनेटमंत्री न करताना त्यांना स्वतंत्र प्रभार दिला जाऊ शकतो. त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला एक जागा राज्यमंत्रीपद मात्र स्वतंत्र प्रभार जागा देणार आहोत.''

अजित पवार म्हणाले, ''यावर आम्ही त्यांना सांगितलं की, प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेटमंत्री म्हणून घ्या. प्रफुल पटेल यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यामुळं त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करणे योग्य नव्हत. म्हणून तुम्ही त्यांना कॅबिनेटमंत्रीपदच द्या. यावर ते म्हणाले की, आम्हाला सगळ्यांनाच सोबत घेऊन जायचं आहे.''

पवार म्हणाले, ''आम्ही त्यांना सांगितलं आहे की, आम्हाला द्यायचं असेल तर कॅबिनेटमंत्रीपद द्या, नाही तर आमची थांबण्याचीही तयारी आहे. आम्ही थांबून एनडीएला पाठिंबा देऊ, आमच्या मनात वेगळं काही नाही. आम्ही मनापासून एनडीएसोबत आहोत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'लवकरच घरी आलो जेवायला'; आईला शेवटचा फोन, J.J हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरुन समुद्रात उडी

Wainganga Flood : वैनगंगेला मोठा पुर; ब्रह्मपुरी तालुक्यातील ८ गावांना पाण्याचा वेढा, अनेक कुटुंबाना हलविले सुरक्षितस्थळी

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह अनेक भागात पाऊस, नागरिकांचे हाल

Bigg Boss 19 : टीम इंडियाच्या या खेळाडूची Ex पत्नीची बिग बॉस १९ मध्ये एन्ट्री?

Pune News: पुण्यात चाललंय काय? स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, पोलिसांकडून १८ मुलींची सुटका|VIDEO

SCROLL FOR NEXT