We do not accept the Supreme Court on Ramdev Baba's Apology in Patanjali Misleading Ads Case Ramdev Patanjali Misleading Ads
देश विदेश

Patanjali Misleading Ads: जनतेची जाहीर माफी मागणार बाबा रामदेव; केंद्राच्या उत्तरावरही सर्वोच्च न्यायालय नाराज

Patanjali Case in Supreme Court: तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळत आहात, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड, संयुक्त सचिव परवाना प्राधिकरणाला फटकारलंय. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावर आम्ही समाधानी नसल्याचे कोर्टाने म्हटलंय. न्यायालयात सुनावणीदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण उपस्थित होते.

Bharat Jadhav

Supreme Court on Ramdev Baba's Apology

योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांच्या कंपनी पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. रामदेव बाबा यांनी दाखल केलेल्या माफीनाम्यावर आपण समाधानी नसल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबांना सुनावलं. रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर केला होता. यावेळी रामदेव बाबा यांच्याकडून ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी युक्तिवाद केला.(Latest News)

बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण जाहीरपणे माफी मागतील, असं वकील मुकूल रोहतगी यांनी कोर्टाला सांगितलं. आम्ही बिनशर्त माफी मागत आहोत, जे आश्वसन आम्ही कोर्टाला दिलं होतं. त्याचं पालन आम्ही करू शकलो नाहीत. यावर निकाल देताना सुप्रीम कोर्ट म्हणाले की, तुम्ही कायदा जाणून आहात का? मागील माफीनाम्यात हेरफार करण्यात आला होता.

एकीकडे तुम्ही सवलत मागत आहात, तेही माफीनाम्यात हेरफार करून, असं म्हणत न्यायालयाने रामदेव बाबा यांना फटकारलं. मागील वेळी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांना परत कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पहिला कल मविआच्या बाजूने

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT