Water On Mars Saam Digital
देश विदेश

Water On Mars : मोठी बातमी! मंगळावर आढळला पाण्याचा मोठा साठा, नदीचं अस्तित्व

NASA Mars Insight Lander Data : मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाखाली ११.५ किलोमीटर ते २० किलोमीटर खोल द्रव्य स्वरूपात पाणी आढळलं आहे. त्यामुळे मंगळावर कधीकाळी जीवसृष्टी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

Sandeep Gawade

अंतराळात असंख्य आकाशगंगा असून एका आकाशगंगेत कोट्यवधी तारे आहेत. यातील कुठे ना कुठे जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. मात्र आता आपल्याच सौरमालेत जीवसृष्टी असण्याची शक्यता बळावली आहे. कारण मंगळ ग्रहावर द्रव्य स्वरूपात पाण्याचा साठा आढळला आहे. याआधी मंगळ ग्रहावर पाण्याच्या वाफेचे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले होते, मात्र यावेळी द्रव्य स्वरूपात पाणी आणि नदीच्या खुणा आढळल्या आहेत.

मात्र हे मंगळाच्या पृष्ठभागावर नसून भूगर्भातील खडकांच्या भेगांमध्ये लपलेलं आहे. पृष्ठभागाच्या मध्यभागात ११.५ किलोमीटर ते २० किलोमीटर खोल पाणी असल्याचे मानलं जातं आहे. 2018 साली नासाचा हा लँडर मंगळावर उतरला होता. नासाच्या मार्स इनसाईट लँडरच्या डेटाचा अभ्यास करताना हा शोध लागला आहे. कोट्यवधी वर्षांपूर्वी मंगळावर नद्या, तलाव आणि महासागर होते. नदीचे खुणा सापडल्या आहेत. मंगळाच्या ध्रुवावर द्रवरूप पाणी असल्याचा हा एक सर्वोत्कृष्ट पुरावा आहे, असं कॅलिफोर्निया विद्यापीठ सॅन दिएगोच्या स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफीचे प्रमुख शास्त्रज्ञ वाशन राईट याचं म्हणणं आहे.

मार्स इनसाईट लँडरने कंपन लहरींच्या मदतीने पाण्याचा शोध लावला आहे. याच पद्धतीतून पृथ्वीवर पाण्याचा किंवा तेल आणि गॅसचा शोध घेतला जातो. सध्या मंगळावर शोध लागलेलं पाणी एका महासागराइतकं पाणी असू शकतं. कोणत्याही ग्रहावर जीवन असण्यासाठी वातावरण आणि द्रव्य स्वरूपात पाणी असण्याची गरज असते. त्यामुळे मंगळावर वस्ती उभारण्यासाठी अशा पद्धतीचं पाणी, चांगली बातमी नसल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

सुरुवातीच्या काळात मंगळ ग्रहावर वातावरणही होतं आणि नदी, पर्वत, महासागरही होते. मात्र कोट्यवधी वर्षांपूर्वी ग्रहावरचं वातावर नष्ट होत गेलं आणि नंतरच्या काळात महासागर आणि नद्यांना मृत स्वरूप आलं आहे. सध्या मंगळावर सापडलेला पाण्याासाठा त्याच्या संपूर्ण पृष्ठभागाखाली असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. नासाच्या मार्स मोहिमेती लँडरवर सेस्मोमीटर हे भूकंप मोजणारं उपकरण बसवण्यात आलं होतं. या उपकरणाने तब्बल 4 वर्षे मंगळाच्या गर्भातील कंपने आणि हालचाली नोंदवल्या आहेत. त्यातून पाण्याचा शोध लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT