Viral Video News: किक सिनेमामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'मैं मौत को छूकर टक से वापस आ सकता हूं' हा डायलॉग खुप गाजला. काही व्हायरल व्हिडीओ पाहिले की नवाजुद्दीनचा हा डायलॉग लगेच आठवतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती स्फोटात थोडक्यात बचावल्याचं दिसत आहे.
परदेशात कपडे धुण्यासाठी वॉशिंग सेंटर्स असतात, जिथे लोक कपडे घेऊन जातात आणि धुवून आणतात. मोठे मोठे वॉशिंग मशिन्स तिथे उपलब्ध असतात. असाच एका सेंटरमधील व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती या वॉशिंग सेंटरमधून बाहेर पडताना दिसत आहे. मात्र ही व्यक्ती वॉशिंग सेंटरमधून बाहेर पडताच मशीनमध्ये मोठा स्फोट होतो. (Latest Marathi News)
या स्फोटाची भीषणता तुम्हाला व्हिडीओ बघताना जाणवेल. त्यामुळे या वॉशिंग सेंटरमधून या व्यक्तीला बाहेर पडायला उशीर झाला असता तर काय झालं असतं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कारण वॉशिंग मशीनमध्ये झालेला स्फोटाची तीव्रता खुप मोठी होती. त्यावेळी आजूबाजूला कोण असतं तर नक्कीच जखमी झाले असते. स्फोटानंतर आगीचा मोठा भडका उडाल्याचंही पाहायला मिळालं. तसेच वॉशिंग सेंटरचंही मोठं नुकसान झालं.
ओनली बॅंगर्स या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 21 मिलियनहून अधिकवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. तर 3 लाख 43 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.