Putin india tour update : Saam tv
देश विदेश

Putin india tour : पुतिन यांच्या भारत दौऱ्याने काय मिळणार? या क्षेत्रात होणार फायदा, ८ महत्वाचे करार गेमचेंजर ठरणार?

Putin india tour update : पुतिन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामुळे भारताला काय फायदा होणार, जाणून घ्या.

Vishal Gangurde

पुतिन द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी भारतात येताहेत

दोन्ही देशांमध्ये ८ मोठे करार होणार; संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार क्षेत्राला मोठा फायदा होणार

ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या अॅडवान्स व्हेरिएंट आणि SU-57 फायटर जेटवर महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता

रशियाचे राष्ट्राध्यक्ष क्वादिमीर पुतीन यांचं विशेष विमान काही तासांत भारतात लँडिग होणार आहे. पुतिन हे दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागीदारीला २५ वर्ष पूर्ण झाल्याने भारतात येत आहेत. ते २३ व्या द्विपक्षीय शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पुतिन यांच्या ४ आणि ५ डिसेंबरच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळत आहे.

पुतिन यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक करार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानंतर ते भारतात येणार आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतर पहिल्यांदा पुतिन भारतात येणार आहेत. दोन्ही देशांच्या प्रमुख व्यक्तींच्या भेटीत महत्वाचे करार होणार आहेत. संरक्षण विभागाशी संबंधित करार होणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोणते ८ करार होणार आहेत?

2030 इकॉनॉमिक कॉर्पोरेशन प्रोग्राम

क्षेत्रनिहाय करार (व्यापार, ऊर्जा, कृषी, आरोग्य, मीडिया इत्यादी)

SU-57 स्टेल्थ फायटर जेट करार

एनर्जी कॉर्पोरेशन डील – मॉड्युलर रिअॅक्टर प्रकल्प

ऑइल सेक्टर

सेक्युरिटी कॉर्पोरेशन करार

RELOS लॉजिस्टिक सपोर्ट संरक्षण करार

ब्रह्मोस मिसाइल अपग्रेड

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतील. या कार्यक्रमात ते गुंतवणुकीच्या संधी, मॅन्युफॅक्चरिंग पार्टनरशिप आणि टेक्नॉलॉजीवर भाष्य करतील.

या कार्यक्रमात डिफेंस कॉर्पोरेशन(संरक्षण) वर विशेष भाष्य केलं जाईल. भारत आणि रशियाच्या ब्रह्मोसच्या अॅडवान्स व्हेरिएंटच्या डेव्हलेपमेंटची परीक्षण केले जाऊ शकते.यात बह्मोस-NG सारख्या एयर लाँच मॉडेल आणि एक्सटेंडेट-रेंज व्हर्जनचाही समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upcoming Bollywood Movies : 'किंग' ते 'रामायण'; 2026 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार 'हे' 8 चित्रपट

रात्रीच्या वेळेस शिट्टी वाजवू नये असं का म्हणतात?

Harshvardhan Patil : सांगलीच्या राजकारणात आणखी एक पाटील, माजी मुख्यमंत्र्यांचा पणतू निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीचा जागावाटप तिढा सुटला?

Badlapur : बसचा सिनेस्टाईल पाठलाग केला, पुलावर गाठलं, कुऱ्हाड घेऊन बस चालकावर हल्ला; बदलापूरमधील धक्कादायक घटना|VIDEO

SCROLL FOR NEXT