Vladimir Putin on Russia Population Saam TV
देश विदेश

Russia Population : हवं तर ऑफिसमध्ये लैंगिक संबंध ठेवा, पण लोकसंख्या वाढवा; पुतिन सरकारचा अजब आदेश

Vladimir Putin on Russia Population : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी घटत्या जन्मदरावर चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त बालके जन्माला घालावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Satish Daud

एकीकडे भारत आणि चीन या दोन देशातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मात्र जगभरातील अनेक देश लोकसंख्येच्या घटत्या दरामुळे त्रस्त झाले आहेत. लोकसंख्या वाढीसाठी या देशांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. यामध्ये रशियाचा देखील समावेश आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी घटत्या जन्मदरावर चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त बालके जन्माला घालावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

हवं तर कामाच्या ठिकाणी आपल्या जोडीदारासोबत शरीरसंबंध ठेवा पण देशाची लोकसंख्या वाढवा, असा सल्लाच पुतिन यांनी आपल्या देशातील नागरिकांना दिला आहे. ऑफिसमध्ये, लंच आणि कॉफी ब्रेक दरम्यान शरीरसंबंध ठेवल्यास लोकसंख्या वाढेल, असंही पुतीन यांनी म्हटलं आहे.

रशियन वृत्तपत्र मेट्रोच्या वृत्तानुसार, युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे देशाची लोकसंख्याही कमी झाली आहे. जवळपास 10 लाखांहून अधिक लोक युद्धाच्या भीतीमुळे पळून गेले आहेत. यात तरुणांचं मोठं प्रमाण होतं. कारण, युक्रेनकडून रशियन तरुणांना सातत्याने टार्गेट केलं जात होतं.

वृत्तपत्रात असाही दावा करण्यात आलाय की, रशियाचा सध्याचा प्रजनन दर प्रति महिला सुमारे 1.5 मुले इतका आहे. हा दर लोकसंख्येच्या स्थिरतेसाठी आवश्यक असलेल्या 2.1 च्या खाली आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार रशियाने 2024 च्या पहिल्या सहामाहीत 25 वर्षांतील सर्वात कमी जन्मदर नोंदवला आहे.

जूनमधील जन्मदर प्रथमच एक लाखाच्या खाली आल्याचेही आकडेवारीवरून दिसून आले आहे. रशियामध्ये जानेवारी ते जून 2024 दरम्यान एकूण 599,600 बालकांचा जन्म झाला, जो 2023 मधील याच कालावधीपेक्षा 16,000 कमी आहे. यावर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी चिंता व्यक्त केली आहे. रशियन लोकांचे संरक्षण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पुतिन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रशियातील जन्मदार नेमका कशामुळे घटतोय? याचे कारण शोधण्यासाठी अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये बहुतांश लोकांनी कामात व्यस्त असल्याने तसेच वेळ मिळत नसल्याने शरीरसंबंध ठेवण्यास वेळ नसल्याचं कारण सांगितलं आहे. यावर बोलताना हवं तर ऑफिसच्या ठिकाणी जोडीदारासोबत शरीरसंबंध ठेवा पण लोकसंख्या वाढवा अशी विनंती राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी देशवासियांना केली आहे.

दुसरीकडे रशियाच्या चेल्याबिन्स्क प्रदेशात जन्मदर वाढविण्याच्या उद्देशाने प्रशासनाने आर्थिक मदत सुरू केली आहे. ज्या अंतर्गत 24 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मावर 1.02 लाख रूबल (9.40 लाख रुपये) देय देण्याची ऑफर दिली जात आहे. दुसरीकडे गर्भपातावर बंदी घालण्यात आली असून घटस्फोट शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT