Firozabad Blast News
Firozabad Blast NewsSaam TV

Firozabad Blast : फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट, अनेक घरे कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू

Firozabad Blast News : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट झाला. या स्फोटात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ११ लोक गंभीर जखमी झाले आहेत.
Published on

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट झाला. या स्फोटात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ११ लोक गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेत अनेक घरे जमीनदोस्त झाली असून काहीजण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता आहे. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तीन जेसीबी आणि हायड्रा मशीन मागवले आहे.

Firozabad Blast News
Delhi Politics : अरविंद केजरीवाल आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, दिल्लीचे नवे सीएम कोण होणार? 'ही' नावे चर्चेत

बचाव कार्यादरम्यान ढिगाऱ्याखाली दबलेल्या 16 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव कार्याला गती देण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या नौशहरा गावात परवानाधारक फटाक्यांचे गोदाम आहे.

सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास या गोदामात अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की आजूबाजूची नऊ घरे जमीनदोस्त झाली. ज्यामध्ये अनेक कुटुंबीय ढिगाऱ्याखाली गाडले गेले. जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत स्फोटाचा आवाज गेला. कानठळ्या बसणारा आवाज होताच परिसरात नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांचा मोठा फौजफाटाही घटनास्थळी दाखल झाला.

घरांच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने ३ जेसीबी आणि हायड्रा मशीन मागवले. बचाव कार्यादरम्यान ढिगाऱ्याखाली दबलेल्या 16 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा जीव गेला आहे. यामध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे.

तर ६ गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका गंभीर जखमीला आग्रा येथे रेफर करण्यात आले आहे. उर्वरित पाच जखमींवर शिकोहाबाद आणि फिरोजाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचलेले आग्रा रेंजचे आयजी दीपक कुमार यांनी सांगितले की, बचाव कार्याला गती देण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी लोक दबले जाण्याची शक्यता आहे.

फटाक्यांच्या गोदामाचा परवाना दुसऱ्या ठिकाणचा होता, मात्र तो येथे अवैधरित्या ठेवण्यात आला होता. परवानाधारक नवी अब्दुल्ला उर्फ ​​भुरे खान हा अनेक घरे भाड्याने घेऊन त्यामध्ये फटाक्यांचा साठा ठेवत असे. ही सर्व घरे रहिवासी भागात बांधण्यात आली आहेत. मात्र, अपघातानंतर अनेक घरांची पडझड झाली असून डझनभराहून अधिक घरांचे दरवाजे-खिडक्याही तुटल्या आहेत. सध्या नवी अब्दुल्ला फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Firozabad Blast News
Weather Forecast : बाप्पाच्या विसर्जनाला पाऊस हजेरी लावणार; तब्बल १३ राज्यांना झोडपून काढणार, वाचा वेदर रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com