बॉयफ्रेंडसोबत लॉजमध्ये जाणं विवाहित महिलेला चांगलं महागात पडलं आहे. नवऱ्याला बायको आणि तिचा बॉयफेंड लॉजमध्ये असल्याचं कळालं. त्यानंतर नवराही लॉजमध्ये आला. नवरा आल्याची माहिती मिळताच बायकोने घाबरून थेट १२ फूट उंचावरून खाली उडी मारली. या महिलेचा उडी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं. त्यानंतर ही बाब नवऱ्याने पोलिसांना सांगितली. नवऱ्याने बायकोच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर बायको माझी हत्या करू शकते, असा दावा करत पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागपतच्या तुगाना गावातील तरुणीचं लग्न २०१९ साली ककोर गावातील तरुणाशी झालं होतं. दोघांना एक मुलगा आहे. दोघे एकत्र राहत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये भांडणे होत आहेत. बायको खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देते, असा पीडित नवऱ्याचा आरोप आहे.
बायको आणि सासू यांनी इतरांच्या साथीने मारहाण केल्याचा आरोप नवऱ्याने केला आहे. मारहाण प्रकरणी नवऱ्याने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर नवरा आणि बायको या दोघांचं समुपदेशन सुरु आहे. दोघांचं आतापर्यंत तीनवेळा समुपदेशन झालं आहे.
पतीचा आरोप आहे की, 'दिल्ली बस स्टँडवर पत्नी बॉयफ्रेंडच्या बाईकवर बसून जात होती. त्यावेळी नवऱ्याच्या भावाने बघितलं. त्यानंतर पती आणि त्याच्या भावाने दोघांचा पाठलाग केला. त्यानंतर पीडित व्यक्तीची बायको आणि तिचा बॉयफ्रेंड एका लॉजमध्ये गेले. नवऱ्याने ही बाब पोलिसांना फोन करून कळवली. यानंतर बायकोला नवरा लॉजमध्ये आल्याचे कळताच तिने छतावरून उडी मारली. या प्रकरणी पोलिसांनी बॉयफ्रेंडला ताब्यात घेतलं आहे. या कारवाईनंतर नवऱ्याने पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.