Viral Video x
देश विदेश

Video : अजबच! आई अन् मुलीला त्यानं केलं एकाच वेळी डेट, दोघीही गरोदर, व्हायरल व्हिडीओची सर्वत्र चर्चा

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी आणि तिची आई एकाच पुरुषाकडून एकाच वेळी गरोदर राहिल्याचा दावा करण्यात आला आहे.

Yash Shirke

  • आई-मुलगी दोघीही एकाच पुरुषाकडून गरोदर असल्याचा दावा.

  • व्हिडीओ व्हायरल होताच जोरदार चर्चा.

  • तिघांवर सोशल मीडियावर टीका.

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हायरल व्हिडीओची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. एक मुलगी आणि आई दोघीही एकाच वेळी, एकाच पुरुषाकडून गर्भवती असल्याचा दावा करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोघींच्या बाळाचा पिता एकच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जेट टीन या इंस्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये जेड टीन तिच्या आईसोबत, डॅनी स्विंग्ससोबत एका कारमध्ये बसल्याचे दिसते. या व्हिडीओवर माझी आई आणि मी एकाच पुरुषाकडून फक्त एका आठवड्याच्या अंतराने गर्भवती आहोत असे लिहिल्याचे पाहायला मिळते. गरोदरपणाला ३४ आठवडे झाले आहेत. आता बाळाच्या जन्माला फक्त एक महिला शिल्लक आहे, असे डॅनी म्हणते. या व्हायरल व्हिडीओमुळे वाद सुरु झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४४ वर्षीय डॅनी स्विंग्स तिची मुलगी, जेडच्या जन्मानंतर डॅनी तिच्या आधीच्या जोडीदारापासून वेगळी झाली. डॅनी निकोलस यार्डी नावाच्या माणसासोबत राहू लागली. दोघांनी काही काळ डेट केले. नंतर डॅनी तिची मुलगी जेड आणि तिचा पार्टनर निकोलस असे तिघे एकाच घरात राहू लागले. त्यावेळेस जेड २२ वर्षांची होती.

जेड आणि निकोलस यांच्यामध्ये वयाचे फारसे अंतर नव्हते. कालांतराने जेड आणि निकोलस यांच्यात जवळीक वाढत गेली. तिच्यामधील संबंध मैत्रीपासून सुरु झाले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हा डॅनी आणि निकोलस एकत्र होते आणि डॅनी गर्भवती होती. निकोलसमुळे जेड गरोदर झाल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली.

सध्या जेड, निकोलस आणि डॅनी एकत्र राहतात. त्यांचा व्हिडीओ आता व्हायरल होत असला, तरी तो दोन महिन्यांपूर्वी अपलोड करण्यात आला होता. एकाच वेळी मुलगी आणि आई एकाच व्यक्तीमुळे गरोदर असल्याने यावरुन तिघांवरही जोरदार टीका झाली. सामाजिक मूल्यांच्या मुद्द्यावरुन तिघांनाही ट्रोल करण्यात आले. ही संपूर्ण गोष्ट खरी आहे की फक्त लोकांचे लक्ष वेधण्यासाठी केलेला स्टंट होता अशी शंका व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: बीडकरांचे स्वप्न साकार : बीड-अहिल्यानगर रेल्वेचा पहिला टप्पा सुरू|VIDEO

Healthy Diet: व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करा! आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश, ठरेल फायदेशीर

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

Virar Tourism: नक्की खंडाळा, माथेरान विसराल! विरारजवळ अवघ्या 10 किमी अंतरावर असलेली ही जागा देईल हिल स्टेशनचा अनुभव

Singer Death : कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन

SCROLL FOR NEXT