Viral Video Saamtv
देश विदेश

Viral VIdeo: आता काय करावं! माझा नवरा कोण आहे; चिमुरडीने रडून रडून घरं डोक्यावर घेतलं..

हा व्हिडिओ मुलगी मोठी झाल्यानंतर तिच्या लग्नात लावा, असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे.

Gangappa Pujari

Viral Video: सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लहान मुलांच्या बाललिला पाहून कधी हसायला येते तर कधी त्यांच्या धाडसाचे कौतुकही करावेसे वाटते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

ज्यामधील चिमुरडी तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल विचारुन विचारुन अगदी घर डोक्यावर घेते. (Latest Marathi News)

लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील खास आणि आनंदाचा क्षण. प्रत्येकजण या दिवसाची वाट पाहत असताना दिसत असतो. पण एखादी लहान मुलगी तिच्या पतीबद्दल विचारायला लागली तरज प्रत्येकालाच हसु येते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असाच बालहट्ट पाहायला मिळत आहे.

काय आहे हा व्हिडिओ..

व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी जमिनीवर बसून आवरताना दिसत आहे. तिला पाहून तिची आई कुठे चाललीसं असे विचारते. यावर ती मुलगी माझ्या नवऱ्याकडे असे उत्तर देते. कुठे आहे तुझा नवरा असा विचारताच ती मामा असे उत्तर देते.

यानंतर ती महिला मुलीला सांगते की, मामा मामीचा नवरा आहे, पप्पा मम्मीचा नवरा आहे, नाना आजीचा नवरा आहे. यावर मुलगी पुन्हा रडते आणि ‘मग माझा नवरा कोण’ असे म्हणते. मग ती बाई म्हणते की ‘तो कुठेतरी खेळत असावा बेटा’. आता हे ऐकून मुलगी पुन्हा एकदा रडते आणि ‘माझा नवरा कुठे गेला’ असे म्हणू लागते. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर creation_patelk नावाच्या आयडीसह मुलीचा हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला नेटकऱ्यांची जोरदार पसंती पाहायला मिळत असून हा व्हिडिओ आतापर्यंत 4.6 मिलियन वेळा पाहिला गेला आहे, तर 46 लाख 1 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक देखील केले आहे. (Viral Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

रेल्वेच्या डब्यावर X चिन्ह का असतं?

Body Shaping Tips : जिमला न जाता घरीच बनवा बॉडी, या 5 गोष्टी 15 दिवस करा फॉलो

Maharashtra Politics: ठाकरे बंधुंच्या युतीनंतर भाजपची मोठी खेळी, बालेकिल्ल्यात शिवसेनेला पाडलं भगदाड; ३ दिग्गज नेते गळाला

Krishnaraaj Mahadik: महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात; कृष्णराज महाडिक महापालिका निवडणूक लढवणार

SCROLL FOR NEXT