देश विदेश

Hanuman Idol Crying : देवाचा कोप की आणखी काही?; हनुमानाच्या डोळ्यांतून अश्रू येत असल्याचा Video व्हायरल

kanpur Hanuman Video : देवाचा हा चमत्कार की संकट अशा चर्चा सुरू झाल्यात.

साम टिव्ही ब्युरो

kanpur News : आज हनुमान जयंतीनिमित्त सर्वत्र हनुमान मंदिरे भाविकांनी भरली आहेत. दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केल्याचे दिसले. अशात सध्या सोशल मीडियावर हनुमंताच्या रडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओपाहून सर्वचजण चकित झालेत. देवाचा हा चमत्कार की संकट अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. (Hanuman Crying )

दरम्यान, कानपूर महानगरातील चकेरी पोलीस स्टेशन परिसरातील कोयला नगर येथील हा व्हिडिओ असल्याचे समजले आहे. येथे पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या मारूती मंदिरात हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला असून शेजारी एक पोलीस शिवाई असल्याचे दिसत आहेत. सदर व्हिडिओ व्हायरल होताच हा चमत्कार पाहण्यासाठी भाविकांनी येथे एकच गर्दी केली.

व्हिडिओ खरा आहे की खोटा हे जाणून घेण्याची उत्सूकता लोकांच्या मनात शिगेला पोहचली. अशात सदर घटना पोलिसांना समजल्यावर त्यांनी देखील या मंदिरात येऊन सदर घटनेची पाहानी केली. त्यावेळी पोलिस देखील देवाच्या दर्शनाला आले आहेत असं समजून या ठिकाणी मोठी गर्दी उफाळून आली.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले आहे. एका व्यक्तीने हा व्हिडिओ स्वत: इडीट करून पोस्ट केला आहे. तसेच हनुमान देवाची मुर्ती रडत असल्याचे यात दाखवण्यात आले आहे. मात्र हे खरे नसून सदर व्हिडिओ खोटा असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Escalator In Marathi: एस्कलेटरला मराठीत काय म्हणतात?

Shocking Video: पर्यटकांच्या बसमध्ये जाण्यासाठी बिबट्याची खिडकीवर झेप, पुढे काय झालं ते पाहाच

Vilas Bhumare : महायुतीचे विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले; हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु, प्रचार थांबला!

20-55 वयोगटासाठी रस्त्यावरील खड्डे ठरतायत धोकादायक; पाठदुखी-फ्रॅक्चरची समस्या बळावत असल्याचा डॉक्टरांचा इशारा

Shreeram Lagoo: अभिनयाची आवड, ४२ व्या वर्षी डॉक्टरकीला रामराम, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT