देश विदेश

Amit Shah Angry : अमित शाहांनी भर कार्यक्रमात जय शाहांना झापलं; नेमकं काय घडलं?

अमित शाह यांनी जय शाह यांना झापल्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदाबाद : केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची कडक शिस्त आणि रोखठोक स्वभाव अवघ्या देशाला माहिती आहे. अनेक व्यासपीठांवर त्यांच्या या स्वभावाची प्रचिती अनेकांना आली आहे. मात्र अमित शाह यांच्या याच रागाचा सामना BCCI चे सेक्रेटरी जय शाह यांना सार्वजनिक ठिकाणी करावा लागला आहे.

तुम्ही कितीही मोठे झालात तरी आई-वडीलांचं ऐकावच लागतं. अमित शाह यांनी जय शाह यांना झापल्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.

गुजरातमध्ये नवरात्रीनिमित्तच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात अमित शाह आणि जय शाह उपस्थित होते. एकीकडे देवीची पूजा सुरु असताना जय शाह कुणाशी तरी बोलत असल्याचं अमित शाहांना दिसलं. ही बाब खटल्याने अमित शाह यांनी जय शाह यांना तिथेच फटकारलं आणि पूजेमध्ये लक्ष देण्यास सांगितलं. (Latest Marathi News)

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्सही बाप बाप असतो अशा कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिलं की, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या सेक्रेटरींना देखील वडिलांचा ओरडा खावा लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT