Home Remedies : तुमची मान काळवडली आहे ? 'हे' घरगुती उपाय करा

मान काळी दिसू लागली आणि चेहरा गोरा किंवा आकर्षक दिसू लागला की, आपली सुंदरता फिकी पडू लागते.
Home Remedies
Home RemediesSaam Tv
Published On

Home Remedies : घामामुळे आपली मान काळी पडते, त्यामुळे त्वचेचा रंग शरीराच्या इतर भागांपासून वेगळा होतो. अशावेळी आपल्याला काय करावे सुचत नाही.

शरीराची स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण दररोज अंघोळ करतो. साबण, उटणे, शॅम्पू वापरून अंग आणि केसांची योग्य निगा राखतो पण तरीही आपली मान काळी पडते.

Home Remedies
Morning Fatigue : सकाळी उठल्यानंतर काम करायची इच्छा होत नाही ? सतत आळस येतो तर, करा 'हे' उपाय

मान काळी दिसू लागली आणि चेहरा गोरा किंवा आकर्षक दिसू लागला की, आपली सुंदरता फिकी पडू लागते. रोज अंघोळ करुन देखील मानेचा भाग काळवडलेला दिसतो. अतिरिक्त घामामुळे त्याभागात घाण किंवा मळ साचतो ज्यामुळे मान काळी दिसू लागते.

अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमची काळी मान उजळू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या घरगुती उपायांबद्दल जे तुमची काळी मान साफ (Clean) ​​करण्यास मदत करतील.

काळी मान गोरी करण्यासाठी काही सोपे उपाय - (How to clean dark neck)

- काळी मान स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चमचाभर तुरटी पावडर, गुलाबजल, १ ते २ चमचे लिंबाचा रस समप्रमाणात मिसळून पेस्ट तयार करू शकता आणि १५ ते २० मिनिटे मानेवर राहू द्या. त्यामुळे बऱ्याच अंशी दिलासा मिळेल.

- हे मिश्रण लावल्यानंतर तुम्ही तुमची मान स्वच्छ पाण्याने (Water) धुवा. साबण न वापरण्याची काळजी घ्या.

Home Remedies
Health Tips : जुनाट सर्दी- खोकल्यावर फायदेशीर ठरेल, आजीच्या बटव्यातील 'हा' बहुगुणी पदार्थ

- या पेस्टशिवाय तुम्ही तुरटीमध्ये बेकिंग सोडा आणि गुलाबपाणी मिक्स करू शकता. यामुळे मानेचा काळेपणाही दूर होतो.

- कोरफड आणि मुलतानी मातीच्या सहाय्यानेही तुम्ही मानेचा भाग चमकदार बनवू शकता. यात मुलतानी माती, एलोवेरा जेल आणि गुलाबपाणी एकत्र करून त्या जागेवर लावायचे आहे. नंतर पॅक सुकल्यावर कोमट पाण्याने धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com