Viral Dance Video Saamtv
देश विदेश

Viral Video: बाबो! गाडीसह तरुणाला घेतले डोक्यावर! सोशल मीडियावर 'स्प्लेंडर डान्स'ची होतेयं तुफान चर्चा; VIDEO पाहून चक्रावून जालं

Splender Dance Viral Video: आता हेच बघायचं राहिलेलं | नागिण डान्स, कोंबडा डान्स, मोर डान्स मार्केटमध्ये आला स्प्लेंडर डान्स....

Gangappa Pujari

Bike On Head Viral Dance Video: सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकदा नेटकऱ्यांचे डोके चक्रावून जाते. यामध्ये सर्वाधिक चर्चा होते ती व्हायरल डान्स व्हिडिओंची. सोशल मीडियावर अनेक एकापेक्षा एक डान्स व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या अशाच एका जबरदस्त डान्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये चक्क गाडी डोक्यावर घेवून तरुण डान्स करताना दिसत आहेत. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ व्हायरल होतात. हे जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहून हसून हसून पुरेवाट लागते. नागिण डान्स, कोंबडा डान्स, मोर डान्स असे आत्तापर्यंत अनेक जबरदस्त डान्स तुम्ही पाहिले असतील. पण आता याच यादीत आणखी एका डान्सची भर झालीये. ज्याचे नाव आहे स्प्लेंडर डान्स.

सध्या या स्प्लेंडर डान्सने सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे. जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. सध्या एका कार्यक्रमादरम्यानच्या विचित्र डान्सचा व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

व्हायरल व्हिडीओत एका कार्यक्रमात सहभागी झालेले लोक अतिउत्साहाने चक्क एका बाईकस्वाराला बाईकसह खांद्यावर उचलून नाचताना दिसत आहेत. या धोकादायक आणि विचित्र पद्धतीने डान्स करणाऱ्यांचा व्हिडीओ तिथे उपस्थित एका व्यक्तीने मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला होता. जो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

व्हिडिओमध्ये लोक गाण्याच्या तालावर डान्स करताना दिसत आहेत. तर काही तरुणांनी एका बाईकस्वाराला बाईकसह खांद्यावर उचलून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे या बाईकवरील तरुणदेखील न घाबरता बिनधास्तपणे नाचताना दिसत आहे.

दरम्यान, या व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारचे स्टंट करुन स्वतःसह इतरांचे जीव धोक्यात घालू नका, अशा शब्दात नेटकऱ्यांनी खडेबोल सुणावले आहेत. तर काही जणांनी या हौशी डान्सरवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT