Woman Climbs Down Building After Lover Pushes Her Outside Saam
देश विदेश

बेडरूममध्ये बॉयफ्रेंड अन् गर्लफ्रेंडचा रोमान्स; बायको आली अन् प्रेयसीला १०व्या मजल्यावर लटकवलं, VIDEO व्हायरल

Woman Climbs Down Building After Lover Pushes Her Outside: चीनमधील १० मजल्यावरून लटकलेल्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल.

Bhagyashree Kamble

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. व्हायरल होणारे व्हिडिओ कधी मजेशीर असतात. तर कधी अंगावर काटे आणणारे ठरतात. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चीनमधील असल्याची माहिती आहे. या व्हायरल व्हिडिओत एक महिला इमारतीच्या १० मजल्यावरील बाल्कनीच्या बाहेर लटकलेली दिसून येत आहे. तिला प्रियकराने बाहेर लटकवले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही विचित्र घटना चीनमध्ये घडली असल्याची माहिती आहे. व्हिडिओमध्ये एक गगनचुंबी इमारत दिसत आहे. दहाव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीबाहेर एक तरूणी लटकलेली दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरूणी आपल्या कथित बॉयफ्रेंडच्या फ्लॅटमध्ये गेली. नंतर अचानक प्रियकरची बायको घरात आली.

प्रियकर घाबरला. त्यानं प्रेयसीला थेट बाल्कनीबाहेर लटकवले. महिला बराच वेळ लटकलेल्या अवस्थेत होती. तिच्या हातात मोबाईल देखील होता. या व्हिडिओत महिला रेलिंगला पकडून लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे. कुणीतरी समोरच्या इमारतीतून तिचा व्हिडिओ शूट केला असल्याचं दिसतंय.

बराच वेळ तरूणी रेलिंग पकडून लटकत होती. काही वेळानंतर तरूणी धाडस करते. तसेच ड्रेनेज पाइप आणि खिडक्यांना पकडून खाली उतरण्याचा प्रयत्न करते. तेव्हा खालील फ्लॅटच्या खिडकीपर्यंत तरूणी पोहोचते. तेव्हा फ्लॅटमधील रहिवासी खिडकी खोलतो. तसेच तो व्यक्ती तरूणीला घरात घेतो. धाडसामुळे तरूणीचे प्राण वाचले. तरूणीचा हा जीवघेणा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकीकडे अधिवेशन सुरू आणि दुसरीकडे मंत्री संजय शिरसाटांनी टाकली नागपुरमधील हॉस्टेलवर धाड, नेमकं काय घडलं?

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा जन्म कुठे झाला, मूळची कुठली?

Akshaye Khanna Role In Dhurandhar: धुरंधरमध्ये अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत नेमका कोण?

मेंदूची रक्तवाहिनी फुटल्यावर शरीरात अचानक दिसतात हे बदल

Bike Taxi: रॅपिडोसह ओलाविरोधात आणखी एक गुन्हा, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT