A man died after being shot by a pet dog SAAM TV
देश विदेश

Viral News: धक्कादायक! पाळीव कुत्र्याने बंदुकीतून गोळी झाडल्याने मालकाचा मृत्यू

Viral News: अनेकांना घरात पाळीव प्राणी पाळण्याचा छंद असतो. परंतु तो जिवघेणाही ठरू शकतो. एका पाळीव कुत्र्याने गोळी झाडून त्याच्याच मालकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Chandrakant Jagtap

Viral News: अनेकांना घरात पाळीव प्राणी पाळण्याचा छंद असतो. परंतु हे प्राणी जेवढे प्रेमळ असतात तेवढेच काही वेळा ते धोकादायक देखील ठरतात. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. येथे शिकारीला निघालेला व्यक्तीचा पाळीव कुत्र्याने गोळी झाडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

रिपोर्टनुसार, मृत व्यक्ती शिकार करण्यासाठी आपल्या कारमधून रायफल आणि पाळीव कुत्र्यासोबत निघाला होता. या दरम्यान कुत्र्याने चुकून कारमध्ये ठेवलेल्या रायफलवर ठेवला. त्यामुळे रायफलमधून गोळी निघाली आणि मालकाला लागली. या घटनेत मालक जागीच कोसळला आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला.

घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन वैद्यकीय पथकानेही सीपीआर देऊन जखमीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या वेळी कुत्रा आणि बंदूक मागील सीटवर होते. त्याचवेळी पीडित व्यक्ती पिकअप गाडीच्या ड्रायव्हिंग सीटच्या शेजारील सीटवर होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विचियापासून ४५ मैल दूर हा अपघात झाला. जखमीला रुग्णालयात नेले होते, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या अपघातावेळी वाहन चालवत असलेल्या व्यक्तीला कोणतीही इजा झालेली नाही आणि ती सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कारमध्ये मागे ठेवलेल्या रायफलमधून गोळी झाडली गेली तेव्हा ती सीट फाडून समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला लागली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान अमेरिकेत अशा चुकून गोळी झाडली गेल्याने लोकांचा जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रिपोर्टनुसार, २०२१ मध्ये चुकून गोळी झाडली गेल्यामुळे अमेरिकेत ५०० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nightmares in AC Room: खरंच एसी लावून झोपल्यास भयानक स्वप्न पडतात? डॉक्टरांनी सांगितलं वैज्ञानिक कारण

Dance Video Viral: गणपतीचा उत्साह! 'अशी चिक मोत्यांची माळ' गाण्यावर आजींनी केलाय डान्स, Video व्हायरल

Railway Rule: आता रेल्वेतून फक्त ३५ किलोच सामान नेता येणार; विमानासारखा नियम होणार लागू

Shivneri Fort History: जुन्नरच्या डोंगररांगेतील शिवनेरी किल्ला, जाणून घ्या इतिहास आणि अनोखी वैशिष्ट्ये

Manoj Jarange: अजूनही संधी आहे, त्याचं सोनं करा नाहीतर...; मुंबईत येण्यापूर्वी मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT