Mumbai : प्रजाकसत्ताक दिनी वाहनाने प्रवास करणार आहात? तर वाहतुकीबाबत अॅडव्हायझरी वाचूनच घराबाहेर पडा

शिवाजी पार्काजवळील सर्व रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
Mumbai News
Mumbai News Saam tv
Published On

Mumbai : प्रजाकसत्ताक दिनी सार्वजनिक सुटी असल्यामुळे बहुतांश मुंबईकर घराबाहेर पडतात. सार्वजनिक सुटीमुळे मुंबईच्या रस्त्यावर वाहतूक कोडींला सामोरे जावे लागते. प्रजाकसत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी अॅडव्हायझरी जाहीर केली आहे. प्रजाकसत्ताक दिनी मुंबईतील (Mumbai) दादर जवळील शिवाजी पार्काजवळील सर्व रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी (Police) दिली आहे. (Latest Marathi News)

Mumbai News
Video : मुंबईत बेस्ट बसला आग; प्रसंगावधान राखत प्रवासी उतरल्याने मोठा अनर्थ टळला

वाहतूक पोलिसांनी (Police) अधिसूचनेत म्हटले आहे की, २६ जानेवारी रोजी दादरच्या (Dadar) शिवाजी पार्क मैदानावर प्रजाकसत्ताक दिनी परेड आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानाच्या आजूबाजूते सर्व रस्ते सकाळी ६ वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे.

प्रजाकसत्ताक दिनी १२ तासांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे . यामुळे या रस्त्यावरील वाहनांची वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात नियोजित केलेल्या रस्त्यावर वळविण्यात येणार आहे.

वाहतूक विभागाचे डीसीपी राजू भुजबळ यांनी जारी केलेल्या वाहतूक अधिसूचनेत म्हटले आहे की, लोकांना धोका, अडथळे आणि गैरसोयी टाळण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सदर वाहतूक व्यवस्थापन केले जात आहे.

वाहतूक व्यवस्थापन कसे आहे?

1) एन. सी केळकर रोड आणि केळुस्कर रोड एल. जे. रोड जंक्शन (गडकरी जंक्शन) पासून दक्षिण आणि उत्तर जंक्शनपर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

२) केळुसकर रोड पूर्वेकडील वाहनांच्या वाहतुकीसाठी एकेरी मार्ग राहणार आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्यावरील वाहतूक या मार्गाने येण्यास परवानगी असेल.

३) केळुस्कर रोडवरील मीनाताई ठाकरे पुतळ्यापासून उत्तरेकडील उजव्या वळणाकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी एकेरी मार्ग असेल.

Mumbai News
Mumbai Corona Case : दिलासादायक! मुंबईत तब्बल 3 वर्षानंतर शून्य कोरोनाबाधितांची नोंद

४) एस. के. बोले रोड हा सिद्धिविनायक जंक्शन ते हनुमान मंदिरापर्यंतचा एकेरी मार्ग असेल.

५) स्वातंत्र्यवीर सावरकर रस्ता हा सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँकेपर्यंत एकेरी मार्ग असेल.

६) सिद्धिविनायक जंक्शनकडून स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना डावीकडे वळण घ्यावे लागणार आहे. अर्थात वाहने गोखले रोड-गडकरी जंक्शन-एलजे रोड-राजा बडे चौक मार्गे पश्चिम उपनगराकडे जातील

७) येस बँक जंक्शन ते सिद्धिविनायक जंक्शनपर्यंत वाहनांना वाहतुकीस प्रवेश नसणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना उपलब्ध पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com