19-Minute MMS Video Sparks Outrage Saam
देश विदेश

१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओनं धुमाकूळ घातला; Forward कराल तर फसाल

19-Minute MMS Video Sparks Outrage: व्हायरल MMS व्हिडिओ शेअर केल्यास होऊ शकतो कारावास. भरावा लागेल लाखभर दंड. कायदा काय सांगतो? वाचा.

Bhagyashree Kamble

सध्या कथित इन्फ्लुएंसरचा १९ मिनिट ३४ सेकंदांचा MMS व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इन्फ्लुएंसर स्वीट जन्नत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडिओमुळे स्वीट जन्नतची बदनामी झाली असल्याचं तिनं सांगितलं. या प्रकरणाबाबत स्वीट जन्नत म्हणाली, 'व्हिडिओमध्ये दिसणारी तरूणी मी नाही', असा दावा तिनं केला आहे. दरम्यान, जर हा व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये आला असेल तर, चुकूनही फॉरवर्ड करू नका, अन्यथा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागेल.

हा व्हिडिओ नेमका कुणाचा?

१९ मिनिट ३४ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक जोडपं दिसत आहे. हे जोडपं आक्षेपार्ह स्थितीत आणि अत्यंत अश्लील संभाषण करताना दिसत आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी या जोडप्यानं जाणूनबुजून हा व्हिडिओ शेअर केला होता का? हा व्हिडिओ हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी शेअर केला होता का? याचा तपास सध्या सुरू आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर हे जोडपे गायब झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. काही जण या व्हिडिओसाठी पैसे देऊ करत आहेत. मात्र, हा व्हिडिओ जर तुम्ही व्हायरल केलात तर, तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

जर तुम्ही आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केलात तर, काय होईल?

भारतीय कायद्यात आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ शेअर करण्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. आयटी कायदा २०००च्या कलम ३७ अंतर्गत, ऑनलाइन आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यास कुणालाही ३ वर्षांपर्यंत तुरूंगवास तसेच ५ लाख रूपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तर, दुसऱ्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांपर्यंतचा तुरूंगवास होऊ शकतो.

या व्यतिरिक्त आयटी कायद्याच्या कलम ६७ अ अंतर्गत, लैंगिक कृत्याचे स्पष्टपणे चित्रण करणारी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यास ५वर्षांसाठी तुरूंगवास तसेच १० लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. तर, दुसऱ्या गुन्ह्यासाठी सात वर्षांपर्यंत तुरूंगवास होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT