NEET PROTEST LOVE STORY: BIHAR STUDENT MARRIES DELHI GIRL AFTER VIRAL JANTAR MANTAR ROMANCE Saam tv
देश विदेश

GEN - G आंदोलनात बहरलं प्रेम; बिहारच्या तरुणाने दिल्लीतील विद्यार्थिनीशी बांधली लग्नगाठ

Delhi Jantar Mantar Viral Lovestory News : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान बिहारच्या विद्यार्थ्याची दिल्लीतील विद्यार्थिनीशी ओळख झाली. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि अखेर दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केल.

Alisha Khedekar

  • दिल्लीतील जंतर-मंतरवरील नीट आंदोलनादरम्यान जुळलं प्रेम

  • बिहारच्या विद्यार्थ्याची दिल्लीतील विद्यार्थिनीशी जुळलं प्रेम

  • आंदोलनादरम्यान झालेल्या संवाद आणि परस्पर मदतीतून दोघांमध्ये प्रेम फुलले

  • अखेर दोघांनी मंदिरात साध्या पद्धतीने विवाह केला

आंदोलनाच्या ठिकाणी घोषणा, मागण्या आणि पोलिसांचा बंदोबस्त हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका प्रेमकहाणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या बिहारच्या तरुणाची ओळख दिल्लीतील विद्यार्थिनीशी झाली आणि काही दिवसांतच या मैत्रीचे रूप प्रेमात बदलले. अखेर दोघांनी मंदिरात जाऊन विवाह केला.

बिहारमधील मोहन श्रीवास्तव हा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात गेल्या अनेक दिवसांपासून सहभागी होता. आंदोलनस्थळी राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खाण्या-पिण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अशाच वेळी दिल्लीतील एका विद्यार्थिनीने मोहनची मदत केली. ती दररोज त्याच्यासाठी काही ना काही खाऊ घेऊन यायची.

मोहनने एका दिवशी गंमतीने, “खायला तर देतेस, पण पाणी कोण देणार?” असा प्रश्न विचारला. त्यावर ती हसली आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्यासाठी पाण्याची मोठी बाटली घेऊन आली. याच निमित्ताने दोघांमध्ये संवाद वाढला. विशेष म्हणजे ती विद्यार्थिनीही नीट परीक्षेची उमेदवार होती आणि पेपरफुटी प्रकरणाविरोधात आंदोलनात सहभागी झाली होती.

दरम्यान, आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या गोंधळात मोहनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो बेशुद्ध पडला. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिने त्याची काळजी घेतली. मोहन शुद्धीवर आल्यानंतर तिने आपल्या भावना व्यक्त करत, “मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,” असे सांगितले. मोहननेही तिच्या प्रेमाला प्रतिसाद दिला. यानंतर दोघांनी मंदिरात जाऊन साध्या पद्धतीने विवाह केला.

या प्रेमकहाणीबाबत विचारले असता विद्यार्थिनीने, “प्रेम ठरवून होत नाही. ते कुठे, कधी आणि कसं होईल हे सांगता येत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या अनोख्या प्रेमकहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी या घटनेवर ‘रिअल लाइफ फिल्मी स्टोरी’ म्हटले असून, तर काहींनी आंदोलनातून जुळलेल्या या नात्याचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blast Blast: भारताच्या शेजारील देशात पोलीस ठाण्यावर हल्ला, १३ जणांचा जागीच मृत्यू

Diva Travel : 'दिव्या'जवळील ७ विरंगुळ्याची ठिकाणे, शहराच्या गोंगाटापासून दूर प्लान करा वन डे ट्रिप

Vastu Shastra : तुमच्या किचनचा ओटा कोणत्या रंगाचा? वास्तू शास्त्रानुसार 'हे' रंग आहेत शुभ

Rain Update : विजांसह मुसळधार पाऊस, कोकणासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: कर्ज आणि मुलीच्या उपचाराच्या चिंतेने शेतकऱ्याने संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT