Kanpur Violence  ANI
देश विदेश

यूपीच्या कानपूरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान दगडफेक, पोलिसांचा हवेत गोळीबार

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये (Kanpur) दोन समाजाचे गट आमने सामने आल्याची माहिती समोर येत आहे. या दोन्ही हिंसक गटांनी एकमेकांवर दगडफेक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये (Kanpur) दोन समाजाचे गट आमने सामने आल्याची माहिती समोर येत आहे. या दोन्ही हिंसक गटांनी एकमेकांवर दगडफेक केली आहे. ही हिंसा रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही काहींनी दगडफेक केली आली आहे. या हिंसक घटनेनंतर घटनास्थळी दोघे जण जखमी झाले आहेत. या हिंसक घटनेला नियंत्रित करण्यासाठी सुरक्षा दलाच्या तीन तुकड्या संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या आहेत. तर पोलिसांनी(Police) बारापेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. (Kanpur Violence News in Marathi )

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार , कानपूरच्या परेड चौकावर आज शुक्रवारच्या नमाज झाल्यानंतर बाजार बंद करण्यासाठी निघालेल्या एका गटाने दगडफेक केली आहे. त्यावेळी दुसरा एका गटाने त्यांच्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी या दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली आहे. त्यामुळं कानपुरात तणावाचं वातवरण निर्माण झालं. या तणावादरम्यान पोलिसांनी दोन्ही गटाच्या लोकांवर लाठीमार केला. तर हिंसक जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही केला. सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

दरम्यान, भाजप प्रवक्ते नूपुर शर्मा यांनी अल्पसंख्याक समुदायाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळं काल मुस्लिम समुदायाच्या एका गटाने नमाज झाल्यानंतर दुकान बंद करण्याची घोषणा केली होती. त्यामुळं आज या गटाने दुकाने बंद करायला सुरुवात केली, परंतु दुसऱ्या धर्माच्या एका गटाने दुकाने बंद करायला विरोध केला. त्यामुळं हा वाद उफाळून आला. मात्र, आता पोलिसांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या पोलिसांकडून तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

Maharashtra Live News Update: दसरा मेळाव्याच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल

RSS @100 years : मीनाक्षीपुरम ते रामजन्मभूमी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी प्रवास, समाजामुळे यशस्वी वाटचाल

Dussehra 2025: रावण दहनाची राख घरात ठेवण्याचे खास उपाय, मिळेल धनलाभ आणि यश

Pune Crime: निलेश घायवळ अन् टोळीला पोलिसांचा मोठा दणका; १० बँक खाती गोठवली, प्रॉपर्टीसुद्धा सील

SCROLL FOR NEXT