Patiala Violence SaamTv
देश विदेश

पंजाबच्या पटियाळामध्ये 2 गटात हिंसाचार; संतप्त जमावाची पोलिसांवर दगडफेक

मिरवणूक काढण्यावरून तणाव

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: पंजाबमधील पटियाला येथे मिरवणूक काढताना दोन हिंसाचार (Violence) सुरु आहे. यावेळी पोलिसांवर (police) देखील दगडफेक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणूक काढण्यावरून तणाव निर्माण झाला होता. मिरवणुकीत खलिस्तान जिंदाबादच्या घोषणाही देण्यात आले होते. या घटनेत अनेक पोलीस (police) कर्मचारी जखमी झाले आहेत.

हे देखील पाहा-

मिरवणूक काढण्यावरून खलिस्तान समर्थकांमध्ये हाणामारी

मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तानविरोधात मोर्चा काढत होते. तेव्हा खलिस्तान समर्थकांनी या मोर्चाला विरोध केला. काही वेळातच दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी (Fighting) झाली. काही खलिस्तानी समर्थक लंगर भवनावर चढले आणि त्यांनी दगडफेक सुरू केली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवाई गोळीबारही (Firing) केला आहे. एका संघटनेने पोलिसांवर दगडफेक केली, तर दुसऱ्या संघटनेने पोलिसांवर तलवारीने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही संघटना मिरवणुकीच्या स्वरूपात फव्वरा चौकाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, दोघांनाही तिथे जाण्याची परवानगी नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या गदारोळात एक एसएचओ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ३ ते ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Nashik Tourism : नाशिकला गेलाय? मग 'हा' ऐतिहासिक किल्ला नक्की पाहा

Vashi Fire : दिवाळीत संसाराची राखरांगोळी, वाशीतील आगीत ४ जणांचा मृत्यू

Amruta Khanvilkar : "दिवाळीचा फटाका"; 'चंद्रा'ला पाहून चाहते झाले सैराट

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची उघडीप, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT