Indonesia Football Match Violence Saam TV
देश विदेश

फुटबॉलच्या इतिहासातील काळरात्र; इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार, १२७ जणांचा मृत्यू

शनिवारी रात्री फुटबॉल सामन्यादरम्यान (Football Match) झालेल्या हिंसाचारात जवळपास 127 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Jagdish Patil

Indonesia Football Match Violence: इंडोनेशियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री फुटबॉल सामन्यादरम्यान (Football Match) झालेल्या हिंसाचारात जवळपास 127 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये लहान मुलांसह पोलिस (Police) अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियातील कंजुरुहान स्टेडियममध्ये (Kanjuruhan Stadium) फुटबॉल सामना झाला. यावेळी अरेमा फुटबॉल क्लबचा त्यांचा कट्टर-प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पर्सेबायाकडून पराभव झाल्याने पर्सेबायाच्या समर्थकांनी मोठ्या फुटबॉलच्या मैदानामध्येच प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकांवर हल्ला करत मोठा गोंधळ घातला.

यामध्ये त्यांनी मैदानात जात हुल्लडबाजी केली. त्यामुळे दोन्हीकडूल गटामंध्ये मोठ्या प्रमाणात उसळलेल्यया हिंसाचारामध्ये 100 हून अधिक फुटबॉल चाहते आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचं दैनिक स्टारने सांगितलं आहे.

तर या हिंसाचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शिवाय या दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करत अश्रुधुराच्या नळकांड्या सोडाल्याचं देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर दंगेघोर पळताना देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दंगलीनंतर घाबरलेल्या प्रेक्षकांनी आपला जीव वाचविण्यासाठी केलेल्या गडबडीमुळे मैदानातून बाहेर पडताना चेंगराचेंगरी देखील झाल्यामुळे त्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेचा देशभरातून निषेध केला जात असून क्रिडा जगतातील दिग्गजांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT