Vietnam Boat Accident:  saam tv
देश विदेश

Vietnam Boat Accident: मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने ही दुर्घटना घडली. यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Bharat Jadhav

  • व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांची बोट उलटली.

  • या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • भारतीय दूतावासाने हेल्पलाइन जारी करून स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे.

व्हिएतनाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांची बोट उलटली आहे. फू क्वोक बेटाजवळ ही दुर्घटना झाली असून यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत अशी माहिती दुतावासाकडून देण्यात आलीय.

व्हिएतनाममधील भारतीय दूतावासने एक्सवर पोस्ट करत सांगितलं की, ही एक दुखद घटना आहे. काही वेळापूर्वी व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली आहे. या दुर्घटनेची संपूर्ण माहिती मिळवली जातेय. स्थानीय अधिकाऱ्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जातंय.

फु क्कोकच्या स्पेशल इकोनॉमिक झोनच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ओशन पियर आयलँड कंपनीची ही बोट पर्यटकांना घेऊन जात होती. ही बोट होनमधील एन थोई पोर्टला जात होती. हे बेट फुक्कोट विमानतळापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे.

होनमधील रूट न्गोईपासून साधरण ४९९मीटर अंतरावर गेल्यानंतर ही बोट समुद्रात उलटली. पर्यटक समुद्रात बुडत असल्याचं लक्षात येताच स्थानिकांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. रेस्क्यूमध्ये सामील असलेल्या एका बोटीच्या मालकाने सांगितलं की, घटनास्थळी ते पाच मिनिटात पोहोचले होते, परंतु लोकांना वाचवण्यात अडचण येत होते, कारण पर्यटक बोटीत अडकले होते.

पाऊस पडत नव्हता पण समुद्राच्या लाटा जोरात उसळत होत्या.अनेकजण बेशुद्ध आहेत. एन थोई बॉर्डर गार्डने घटनास्थळी दोन जहाज आणि ३५ अधिकारी तसेच सुरक्षा रक्षक पाठवलेत. ते नेव्ही, कोस्ट गार्डच्या बचाव कार्यात मदत करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

SCROLL FOR NEXT