Rescue teams search for missing passengers after a boat carrying Indian tourists capsized near Phu Quoc Island, Vietnam. saam tv
देश विदेश

व्हिएतनाममध्ये ३३ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममधील फू क्वोक बेटाजवळ 33 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली. स्थानिक प्रशासनाकडून शोध आणि बचावकार्य सुरू असून भारतीय दुतावासाकडून माहिती देण्यात आली आहे.

Omkar Sonawane

व्हिएतनाममधील फू क्वोक बेटाजवळ आज भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट उलटल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून शोध आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती व्हिएतनाममधील भारतीय दुतावासाने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बोटीमध्ये 33 प्रवासी होते.

दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फू क्वोक बेटाजवळ काही भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट काही तासांपूर्वी उलटल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नसून स्थानिक प्रशासनाकडून शोध व बचावकार्य सुरू आहे, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान,कुटुंबांना मदत आणि माहिती देण्यासाठी भारतीय दूतावासाने तातडीने पावले उचलली आहेत. हो ची मिन्ह सिटी येथील भारतीय वाणिज्य दूतावासात एक नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला आहे. तसेच हनोई येथेही आणखी एक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.या नियंत्रण कक्षांमार्फत घटनेबाबत माहिती देणे आणि या कुटुंबांना आवश्यक ती मदत पुरवली जाणार असल्याचे दूतावासाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

Maharashtra News Live Update: पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

SCROLL FOR NEXT