Viral Video  Saam Tv
देश विदेश

Viral Video : पत्नीला BF सोबत स्कूटीवरून फिरताना पाहिले, पतीने पाठलाग करुन पकडले अन् ...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

साम वृत्तसंथा

Viral Video: आग्रा येथून एक व्हिडिओ समोर आला आहे. पत्नी तिच्या बॉयफ्रेंडसोबत बाईकवरुन फिरत असल्याचे पतीला दिसले, यावेळी पती- पत्नीचा पाठलाग करुन पत्नीला थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ (Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

यावेळी पत्नीला आपला पती पाठलाग करत असल्याचे लक्षात आले. यावेळी महामार्गावर पती-पत्नी चांगलाच गोंधळ सुरू असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पतीला महामार्गावर त्याची बायको तिच्या प्रियकरासोबत स्कूटीवरून फिरताना दिसली. यावेळी पतीच्या बाईकवर त्यांची मुलगीही होती.

पत्नी आणि त्याच्या मित्राने बाईक थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत (Video) दिसत आहे. यावेळी पती रस्त्यावर जोरजोरात ओरडत असल्याचे दिसत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्यांनीही घटनास्थळी गर्दी केल्याचे दिसत आहे. भरधाव वेगाने पतीने, पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडची स्कूटी थांबवली. यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाल्याचे दिसत आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीसही (Police) घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेली माहिती अशी, या दाम्पत्याचे लग्न १० वर्षापूर्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेला एक मुलगीही आहे. या महिलेचे एका तांदूळ व्यापाऱ्याशी जवळचे संबंध आहेत. याचा पतीला संशय आला. या संदर्भात दोघांमध्ये अनेकदा भांडणही झाली आहेत. पत्नी आज न सांगता घरातून निघून गेल्यावर पतीने तिचा पाठलाग सुरू केला. त्याला पत्नीचा संशय आला होता. यावेळी पतीने पत्नीला बॉयफ्रेंडसोबत पकडले. या प्रकरणाचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT