ईश्वरसेवा...! रुग्णावरील ऑपरेशनसाठी डॉक्टरनं ट्रफिकमध्येच कार सोडली, ३ किमी धावला अन्...

एका डॉक्टरने रुग्णांची सेवा हाच खरा धर्म याचं उत्तम उदाहरण देत सर्वच स्तरातून वाहवा मिळवली आहे.
Doctor govind nandkumar 3km run from traffic jam
Doctor govind nandkumar 3km run from traffic jamsaam tv
Published On

बंगळुरू : येथील एका डॉक्टरने रुग्णांची सेवा हाच खरा धर्म याचं उत्तम उदाहरण देत सर्वच स्तरातून कौतुकाची थाप मिळवली आहे. रुग्णासाठी डॉक्टर हाच देव असतो, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण मणिपाल हॉस्पिटलमधील डॉक्टर गोविंद नंदकुमार (Dr. Govind NandaKumar) यांनी जबाबदारी काय असते, याचं उत्तम उदाहरण सर्वांसमोर आणलं आहे. एका महिला रुग्णाची एमरजन्सी लॅप्रोस्कोपीक गॉलब्लॅडर सर्जरी (laparoscopic gallbladder surgery) करायची होती. परंतु, डॉक्टर गोविंद नंदकुमार वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रियेची चिंता लागली होती. पण गॅस्ट्रोएंट्रोलॉजीचे सर्जन नंदकुमार रस्त्यात मोठी वाहतूक कोंडी (Traffic) झाली असतानाही कार सोडून थेट रस्त्यावरून तीन किलोमीटर धावत रुग्णालयात पोहोचले. (Banglore manipal hospital latest news update)

Doctor govind nandkumar 3km run from traffic jam
रजनीकांत पुन्हा झाले आजोबा, मुलगी सौंदर्याने दिला मुलाला जन्म ; शेअर केला बाळाचा पहिला फोटो

महिलेचा शस्त्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं असल्याने नंदकुमार यांनी वाहतूक कोंडीला दे धक्का करत तीन किमी धावून थेट रुग्णालय गाठले. त्यावेळी डॉ. नंदकुमार यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रियेची पूर्ण तयारी केली होती.त्यामुळे महिला रुग्णाची वेळेत शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. नंदकुमार यांनी धाडस करून रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य दिले. त्यांच्या या कार्याबद्दला सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वेळीच शस्त्रक्रिया करायची होती

डॉ. नंदकुमार वाहतूक कोंडीत अडकल्याने बराचसा वेळ फुकट गेला होता. पण महिला रुग्णाची वेळेवर शस्त्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक होतं. कारण डॉक्टरला उशीर झाला असता तर महिला रुग्णाची प्रकृती बिघडली असती. या सर्व गोष्टींमुळं डॉ. नंदकुमार चिंतेत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या डॉक्टर नंदकुमार यांनी कार सोडून रस्त्यावरून धावत रुग्णालय गाठले.

Doctor govind nandkumar 3km run from traffic jam
राज्यभरात लम्पी आजाराचं संकट; नाना पटोले यांनी शिंदे सरकारकडे केली मोठी मागणी

वेळेवर झाली शस्त्रक्रिया

डॉ. नंदकुमार यांच्या टीमने शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण तयारी केली होती. डॉक्टर रुग्णालयात वेळेवर पोहोचले. त्यानंतर डॉक्टर रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर मध्ये पोहोचल्यावर त्यांच्या टीमने रुग्णाला बेशुद्धीचं एनस्थिसीया दिलं. डॉक्टर नंदकुमार यांनी वेळेवर रुग्णाचं ऑपरेशन केलं. महिला रुग्णाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि तिला रुग्णालयातू डिस्चार्ज देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com