मनेका गांधी Saam TV
देश विदेश

कुत्र्याच्या उपचारावरुन भडकल्या मनेका गांधी, भाषेचा स्तर घसरला

नवी दिल्लीच्या एका पशुवैद्यक डाॅक्टरला माजी मंत्री मनेका गांधी यांनी एका कुत्र्याच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत शिवीगाळ केल्याची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली असून ट्वीटरवर मनेका गांधी यांचा निषेध करणारा ट्रेंड सुरु झाला आहे.

साम टिव्ही

नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या एका पशुवैद्यक डाॅक्टरला माजी मंत्री मनेका गांधी यांनी एका कुत्र्याच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत शिवीगाळ केल्याची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली असून ट्वीटरवर मनेका गांधी यांचा निषेध करणारा ट्रेंड सुरु झाला आहे.

दिल्लीतल्या अंजली चौधरी यांच्या कुत्र्यांच्या पायाचं आॅपरेशन डाॅ. विकास शर्मा या डाॅक्टरनं केलं होतं. ऑपरेशननंतर कुत्र्याच्या पायाला घातलेले टाके तुटल्याची तक्रार येताच मनेक गांधी भडकल्या आणि त्यांनी संबंधित डाॅक्टरला फोन केला. आणि शिवीगाळ केली. याडॉक्टरांसोबत खालच्या स्तरावरील भाषेत बोलण्यानं देशभरातले पशुवैद्यक नाराज झाले आहेत. ट्वीटरवर मनेका गांधींचा निषेध, बायकॉट मनेका गांधी असा ट्रेंड सुरु झाला आहे.

मेनका गांधींनी डॉक्टरांना वापरलेल्या भाषेचा निषेध करत पशुवैद्यक डॉक्टर देशभरात काळा दिवस पाळणार आहेत. मनेका गांधीसारख्या जेष्ठ राजकारण्यांकडून डॉक्टरांना वापरलेल्या भाषेमुळं पशुवैद्यकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. मनेका यांनी या डाॅक्टरला उद्देशून हरामी, हरामजादे असे शब्द वापरल्याचे आॅडिओ क्लिपवरुन दिसत आहे. या डाॅक्टरची डिग्री कॅन्सल करण्याची धमकीही मनेका यांनी फोनवरुन दिली आहे.

काय म्हणाल्या मनेका गांधी......

मनेकाच्या ऑफिसमधून फोन डॉक्टर विकास शर्मांना

डॉक्टर विकास - नमस्कार मॅडम,

मनेका -तुमने एक कुत्ते का टाँग काट दिया था बेवहज, आ, वो लडकी आयी थी अंजली चौधरी, मैने देखा तुमने कित तरह से पैर काटा हरामजादे उसपर स्टिचेस भी खुल गए, उसकी कंडिशन हो गयी मरने लायक ये कोई तरीका नही है एडव्होकेशन का? अभी उसके स्टिचेस भी खुल गए है

डॉक्टर विकास -मॅम उसके स्टिचेस सही लगे थे, एक दिन के लिए मॅडम कुत्ते को घर ले गयी थी, हमने उनको बोला था की आप केअर ले की वो स्टिचेस खोल ना दे, वो बोली हम केअर कर लेंगे, और अगले ही दिन वो हमारे पास ले के आ गयी त

मनेका - और तुमने हरामजादे बोला की हमारे पास दवाई नही है, इधर से ले आओ, उधरले ले आओ, बदमाश, मै तुम्हारा लाईसन्स कॅन्सल कराऊंगी बदमाश और घटीया तुम और रत्नेश, तुम्हारे पास डिग्री भी है क्या ?

विकास - मै जनरल फिजीशियन और बीव्हीएचसी हूँ

मनेका - ये कुत्ता मगर जाए तो अभी अभी मै तुम्हाला लायसन्स मै खूद ले लूँगी, अभी जाओ और ट्रिटमेंट करवाओ और अपने पैसे से

विकास शर्मा - मॅडम ओके

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT