L K Advani admitted to Apollo Hospital in Delhi with chest infection 
देश विदेश

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

L.K. Advani Health Update:भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९८ वर्षीय अडवाणी यांना शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले.

Bharat Jadhav

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली असल्यानं त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९८ वर्षीय अडवाणी यांना संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अडवाणी यांना छातीत संसर्ग होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृती माहिती दिलीय. अडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. सध्या त्यांच्यावर फुफ्फुसविषयक विभागात (पल्मोनरी डिपार्टमेंट) उपचार सुरू आहेत. एक आठवडा आधी ७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते अडवाणी यांची नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकारनं २५ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त अडवाणींचे आशीर्वाद घेतले होते.

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबतच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. त्यांनी नमूद केले की, अडवाणी यांची अनेक दशकांची सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रासाठी दिलेले योगदान यांचा अत्यंत खोलवर प्रभाव पडलाय. देशाच्या प्रगतीला बळकटी देण्यात अडवाणी यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही मोदींनी आपल्या पोस्टमधून प्रकाश टाकला होता.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सरकारची धुरा सांभाळली. त्यानंतर, त्यांनी तीन कार्यकाळांपर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. पुढे ते पंतप्रधान झाले आणि त्यांनी सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! देशातील दोन बँकांचं होणार विलीनीकरण; RBI नं दिली मंजुरी

SCROLL FOR NEXT