Venezuela Earthquake Saam Tv
देश विदेश

Venezuela Earthquake: सर्वात भीषण भूकंपात 10 हजार बळी? 40 सेकंदात अख्खं शहर जमीनदोस्त

Venezuela Hit by Century’s Strongest Earthquake: व्हेनेझुएला शक्तीशाली भूकंपाच्या धक्क्याने हादरले. दोन भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण शहर जमीनदोस्त झालं.

Priya More
  • व्हेनेझुएलात शक्तीशाली भूकंप

  • ४० सेकंदांच्या अंतराने ७.१ आणि ७.५ रिश्टर स्केलचे दोन मोठे भूकंप

  • राजधानी कराकसमध्ये इमारती आणि घरे पत्त्यासारखी कोसळली

  • USGS च्या अंदाजानुसार १० हजार नागरिकांच्या मृत्यूची भीती

रोहित कदम, साम टीव्ही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारवाईमुळे चर्चेत आलेल्या व्हेनेझुएला मोठ्या नैसर्गिक संकटाचा फटका बसलाय. व्हेनेझुएलात शतकातील सर्वात शक्तिशाली भूकंपामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याची चिन्हे आहेत. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

जगात सर्वाधिक भूकंपाचे धक्के बसलेला देश म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर येतो, तो म्हणजे जपान. मात्र, असं असताना जगातील आणखी एक देश भीषण भूकंपामुळे ओळखला जाण्याची शक्य़ता आहे. होय. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला शतकातील दोन सर्वात भीषण भूकंपांनी हादरून गेलंय. 7.1 आणि 7.5 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाच्या धक्क्यांनी कराकस शहरातील इमारती आणि घरे अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली आहेत. तर अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, या नैसर्गिक आपत्तीत तब्बल 10 हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. जगात याआधी कुठे-कुठे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत मोठी जीवितहानी झाली होती ते पाहूयात...

2004 मध्ये हिंदी महासागरात आलेल्या 9.1 रिश्टर स्केल भूकंपाने निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटांमुळे 14 देशांमध्ये जीवितहानी व वित्तहानी झाली होती.

2005 मध्ये इंडोनेशियातील सुमात्रा येथे 8.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. यात जवळपास 1 हजार 300 जणांचा मृत्यू झाला होता.

2010 मध्ये चिली या देशातील मौले शहरात अंदाजे 525 जणांचा मृत्यू झाला होता.

2011 मध्ये जपानमध्ये तोहोकू शहरात 9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीत सुमारे 18 हजार 500 नागरिक बाधित झाला होता.

व्हेनेझुएलासोबतच उत्तर जपानमध्येही 6.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय. या भूकंपात कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी जपान हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. त्यामुळे या सगळ्यात चर्चा झाली ती दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाचीच. हजारोंच्या संख्येनं बळी जाण्याची भीती असल्यानं व्हेनेझुएलातील भूकंप शतकातील सर्वात भीषण भूकंपांपैकी एक असण्याची शक्यता वर्तवली जातेय. काही सेकंदांच्या भूकंपानं क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालंय. त्यामुळे या देशातील उद्ध्वस्त झालेल्य़ा नागरिकांसमोर या मोठ्या संकटातून सावरण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; अंतर्गत वादानंतर कोल्हापुरातील बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT