Vande Bharat Sleeper Trains x
देश विदेश

Vande Bharat Sleeper Trains : दिवाळीत मिळणार गुडन्यूज! वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्वाची अपडेट

Vande Bharat Sleeper trains to launch : वंदे भारत स्लीपर ट्रेनशी संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरु होणार हे सांगितले आहे.

Yash Shirke

  • कधी सुरु होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन?

  • दिवाळीत मिळणार गुडन्यूज?

  • रेल्वेमंत्र्यांनी दिली अपडेट

Vande Bharat : वंदे भारत स्लीपर ट्रेनशी संबंधित मोठी माहिती समोर आली आहे. या स्लीपर ट्रेनबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. दुसरी ट्रेन तयार झाल्यानंतर दोन्ही गाड्यांचा प्रवास सुरु होईल असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे. स्लीपर ट्रेन सुरु व्हायला ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा उजाडू शकतो असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पण स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गांवर धावतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वंदे भारतच्या दुसऱ्या ट्रेनचे काम सुरू आहे. हे काम १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण होऊ शकते, दोन्ही स्लीपर गाड्या एकाच वेळी सुरू केल्या जातील, सुरळीत सेवा सुनिश्चित करण्यासाठी दुसरी ट्रेन आवश्यक आहे. म्हणून आम्ही ट्रेनच्या दुसऱ्या रेकीची वाट पाहत आहोत. ते मिळताच आम्ही मार्गिकेबाबत निर्णय घेऊ आणि काम सुरू करू, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

लवकरच नवी दिल्ली आणि पटना दरम्यान नवीन रेल्वे गाड्या सुरु होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी पंजाबमध्ये सुरु असलेल्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. आगामी १८ किमी लांबीचा राजपुरा-मोहाली मार्ग अंबाला-अमृतसर मुख्य मार्गावरील सर्वात लहान मार्गाने या प्रदेशाला चंदीगडशी जोडेल, असे दोन्ही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

रेल्वे मंत्रालयाने नवी दिल्ली आणि फिरोजपूर कॅन्ट दरम्यान एक नवीन वंदे भारत ट्रेन सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ही ट्रेन फरीदकोट, बठिंडा, धुरी, पटियाला, अंबाला कॅन्ट, कुरूक्षेत्र आणि पानीपत या स्थानकांना जोडेल. ही ट्रेन दिल्ली आणि फिरोजपूर कॅन्ट दरम्यानचा ४८६ किमीचा प्रवास ६ तास ४० मिनिटांत पूर्ण करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत ट्रेनला मंजुरी देण्याची विनंती करतो, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Kalyan : कल्याणमधील नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प, कारण काय?

SCROLL FOR NEXT