Vande Bharat Express Saam Tv
देश विदेश

VIDEO: वंदे भारत एक्सप्रेसने ट्रायल रनमध्येच मोडले सर्व रेकॉर्ड; स्पीड पाहून चक्रावून जाल

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vande Bharat Express: बहुचर्चेत सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसची नुकतीच स्पीड ट्रायल झाली. या ट्रायलमध्ये वंदे भारत एक्सप्रेसने आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. या ट्रेनची स्पीड बघून सर्वच हैराण झालेत. ही ट्रेन (Train) ताशी १८० किमी वेगाने धावते. एक्सप्रेसच्या ट्रायल रनचा व्हिडीओ समोर आलाय. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय.

सध्या देशात दोन वंदे भारत ट्रेन धावत आहेत. भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन ही नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली. त्यानंतर पुढे नवी दिल्ली ते कटारा यादरम्यानही वंदे भारत ट्रेन चालवण्यात आली. पहिल्या दोन ट्रेनच्या यशस्वी प्रवासानंतर आता तिसऱ्या वंदे भारत ट्रेनची ट्रायल चाचणी घेण्यात आली. ही चाचणी वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी कोटा-नागदा मार्गावर करण्यात आली. या चाचणीतच ट्रेनने ताशी १८० किमी इतका वेग पकडला.

वंदे भारतची तिसरी ट्रेन ही मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ट्रेनची ट्रायल रन टेस्ट रिसर्च, डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) च्या टीमच्या देखरेखीखाली झाली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्रेनच्या स्पीड ट्रायलचे दोन व्हिडीओ शेअर केलेत.

यामधील एक व्हिडीओ हा इंजिन रूममधला असून लोको पायलट यामध्ये ट्रेनची स्पीड दर्शवत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओत एका स्पीड मीटरमध्ये ट्रेनचा ताशी वेग दाखवला जात आहे. सोबत पाण्याने भरलेला एक ग्लासही दाखवण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे जेव्हा ट्रेन ताशी १८० किमीचा वेग पकडते, तेव्हा ग्लासमधील पाण्याचा एकही थेब बाहेर पडला नाही. यावरून ट्रेनच्या बॅलेन्सचा अंदाज येतो.

वंदे भारतमध्ये ‘या’ सुविधा मिळणार

स्वदेशी बनावटीची ही ‘वंदे भारत’ सेमी हायस्पीड ट्रेन आहे. वंदे भारत ट्रेनला वेगळे इंजिन नाही. यात ऑटोमेटिक दरवाजे आणि एअर कंडिशनर चेअर कार कोच आणि रिव्हॉल्व्हिंग चेअर आहे. ही चेअर १८० डिग्रीपर्यंत फिरू शकते. ट्रेनमध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी. - उद्धव ठाकरेंचा शिंदेंना जोरदार टोला

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT