Vande Bharat Express News In Marathi Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Express Accident : वंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात, मोठा अनर्थ टळला, पण...

मागील महिन्यातच सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला.

साम ब्युरो

Vande Bharat Express Accident News : गुजरातच्या आणंद रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत एक्स्प्रेसला शुक्रवारी अपघात झाला. एका गायीला वंदे भारत एक्स्प्रेसची धडक लागली. या धडकेमुळं ट्रेनच्या पुढच्या भागाचं नुकसान झालं.

वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) दोन दिवसांत दुसऱ्यांदा अपघात झाला. दुर्घटना घडली त्यावेळी पायलट सतर्क असल्याने अनर्थ टळला. पायलटनं तात्काळ हॉर्न दिला आणि ब्रेक लावला. ही घटना गांधीनगर-मुंबई या दरम्यान घडला. (Latest Marathi News)

आदल्या दिवशीच म्हणजे गुरुवारी नव्यानेच सुरू झालेल्या सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसने चार म्हशींना धडक दिली होती. (Accident) त्यात ट्रेनच्या पुढच्या भागाने मोठे नुकसान झाले होते. तब्बल २० मिनिटांनंतर ट्रेन मार्गस्थ झाली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत कोचिंग केअर सेंटरमध्ये दुरुस्तीनंतर ट्रेन पुन्हा गुजरातसाठी रवाना झाली होती.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुर्घटनेत ट्रेनचं किरकोळ नुकसान झालं आहे. शुक्रवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास मुंबईपासून जवळपास ४३२ किलोमीटरवर आणंद रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे, असे वृत्त एका मीडिया हाउसने दिले आहे.

ट्रेनच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मागील ३० सप्टेंबरलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमी हायस्पीड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. ६ दिवसांनंतरच या ट्रेनला सलग दुसऱ्यांदा अपघात झाला. सुदैवाने दोन्ही दुर्घटनांमध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singada Benefits : शिंगाडे संजीवनीपेक्षा कमी नाही; ५ फायदे वाचून व्हाल चकीत, आजच आहारात करा समावेश

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

SCROLL FOR NEXT