Uttarkhand bus Accident News saam tv
देश विदेश

उत्तराखंडमध्ये शाळेची बस उलटून भीषण अपघात; २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, काही जखमी

उत्तराखंडच्या सितारगंजमध्ये एक शाळेची बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Uttarkhand bus Accident News : उत्तराखंडच्या सितारगंजमध्ये एका शाळेच्या बसचा उलटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

उत्तराखंडमधील (Uttarakhand) सदर शाळेच्या (School) बसमध्ये एकूण ५१ विद्यार्थी प्रवास करत होते. तसेच बसमध्ये शाळेचे ७ कर्मचारी होते. नेमकी ही बस कशामुळे उलटली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची दखल उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत मदतीचे आदेश देत मृत विद्यार्थ्यांना (Student) श्रद्धांजली वाहिली आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करत म्हटले की, 'नयागांव भट्टे (सितारगंज ) मधील वेदराम शाळेच्या बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनामार्फत सर्व जखमींना घटनास्थळाजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे'.

दरम्यान, सदर अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. परंतु अपघातात नेमके किती विद्यार्थी जखमी झाले आहेत, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, दोन विद्यार्थ्यांचा मृ्त्यू झाल्याची पुष्टी मिळाली आहे. या अपघातातील जखमी विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक लोकही अपघातस्थळी पोहोचले होते. त्यांच्या मदतीनेच चिमुकल्या मुलांना बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: तूळ, कुंभ, मिथुन राशींच्या लोकांसाठी लकी दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

SCROLL FOR NEXT