Uttarkashi tunnel Crash News/ANI SAAM TV
देश विदेश

Char Dham tunnel crash : उत्तरकाशीत बोगद्यात अडकलेले ४० कामगार सुरक्षित, पाईपद्वारे पुरवले ऑक्सिजन आणि अन्नाची पाकीटे

Uttarkashi tunnel Crash News : उत्तराखंडमधील उत्तरकाशीत राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळल्यानंतर मलब्याखाली ४० कामगार अडकले होते. ते सर्व सुरक्षित आहेत.

Nandkumar Joshi

Uttarkashi tunnel Crash News :

उत्तराखंडमधील उत्तरकाशीत राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग रविवारी सकाळी कोसळल्यानंतर मलब्याखाली ४० कामगार अडकले होते. ते सर्व सुरक्षित आहेत. बचावकार्य सुरू आहे. त्यांना पाईपद्वारे ऑक्सिजन, पाणी आणि अन्नाची पाकीटं पुरवली जात आहेत.

बोगद्याच्या मलब्याखाली ४० कामगार अडकले होते. ते सर्व सुरक्षित आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. त्यांना ऑक्सिजन आणि पाणी पाईपद्वारे पुरवण्यात आले आहे, अशी माहिती सर्कल ऑफिसर प्रशांत कुमार यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एनडीआरएफचे असिस्टंट कमांडंट कर्मवीर सिंह भंडारी यांनी सांगितले की, बोगद्यात अडकलेले सर्व ४० कामगार सुरक्षित आहेत. त्यांना पाणी आणि अन्नाची पाकीटं पुरवली जात आहेत. बचावकार्य वेगाने सुरू आहे. मलबा ओला असल्यानं पुन्हा पुन्हा कोसळत आहे, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काही प्रमाणात अडचणी येत आहेत.

आम्ही काल बोगद्याच्या आतमध्ये अडकलेल्या सर्व कामगारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. बोगद्यात १५ मीटरपर्यंत आत पोहोचलो आहोत. जवळपास ३५ मीटरपर्यंत आत पोहोचायचं आहे. बोगद्यात जाण्यासाठी बाजूलाच आम्ही वेगळा मार्ग तयार केला आहे, अशी माहितीही एनडीआरएफकडून देण्यात आली.

एएफपीच्या वृत्तानुसार, बोगद्याच्या मलब्याखाली अडकलेल्या कामगारांना ट्युबच्या माध्यमातून ऑक्सिजन दिले जात आहे. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मशिनद्वारे मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, ही दुर्घटना रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. जवळपास साडेचार किलोमीटर लांब बोगद्याचा १५० मीटरपर्यंतचा भाग कोसळला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी थोड्याच वेळात घटनास्थळी भेट देऊन आढावा घेणार आहेत, अशी माहितीही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Accident News : पुण्यात अपघाताचा भयानक थरार! भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, गाडीचा चक्काचूर

Ladki Bahin Yojana : फक्त १२ दिवस शिल्लक! आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींचे e-KYC पूर्ण; मुदत वाढवणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Woman Physical Changes: प्रेग्नेसीनंतर स्त्रियांच्या शरीरात होतात हे ५ बदल, वेळीच घ्या काळजी

Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का, नंदुरबारमध्ये अनेकांनी कमळाची साथ सोडली

SCROLL FOR NEXT