Rat Hole Mining Explained in Marathi Rat Hole Mining-yandex
देश विदेश

Rat Hole Mining Explain: 'रॅट होल मायनिंग' म्हणजे काय? या पद्धतीने खोदकाम कसं केलं जातं?

Uttarkashi Tunnel Rescue update: मजुरांना वाचविण्यासाठी NDRF आणि SDRF काही जवान बोगद्यात पोहोचले आहे. या सर्व मजुरांना 'रॅट होल मायनिंग' पद्धतीने खोदकाम करून बाहेर काढण्यात येणार आहे.

Vishal Gangurde

Rat Hole Mining Explain in Marathi:

उत्तराखंडच्या उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात गेल्या १६ दिवसांपासून ४१ मजूर अडकलेले आहेत. ताज्या माहितीनुसार, उत्तरकाशीच्या सिलक्याराच्या बोगद्यातून मजुरांना बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या बोगद्यातून पाइप आर पार गेला आहे. तर या मजुरांना वाचविण्यासाठी NDRF आणि SDRF काही जवान बोगद्यात पोहोचले आहे. या सर्व मजुरांना 'रॅट होल मायनिंग' पद्धतीने खोदकाम करून बाहेर काढण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील चारधाम मार्गावरील बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठीचं काम पूर्ण झालं आहे. मजुरांना बाहेर काढण्यासाठी २५ टन वजनी अमेरिकी ऑगर मशीनच्या मदतीने बोगद्याचं खोदकाम सुरु होतं.

खोदकाम करताना अनेक अडथळे आले होते. 'रॅट होल मायनिंग' करण्याआधीच ४७ मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रॅट होल मायनिंग म्हणजे काय?

'रॅट होल मायनिंग' ही धोकादायक प्रक्रिया आहे. खोदकाम करताना ४ फुटांपेक्षा रुंद नसलेले छोटे खड्डे खोदले जातात. कोळसा खाणीत या पद्धतीचा वापर केला जातो. या खोदकाम पद्धतीतून कोळसाही काढला जातो. या पद्धतीने खोदकाम करताना छोटे-छोटे खड्डे खोदले जातात. त्यातील कोळसा जवळच फेकला जातो. त्यानंतर एकत्ररित्या कोळसा बाहेर फेकला जातो.

रॅट होल मायनिंग' पद्धतीत मजुरांकडून छिन्नी-हातोड्याचा उपयोग करून खोदकाम केलं जातं. ही मेघालयमधील खोदकामाची सामान्य पद्धत आहे. खाणीत खोदकामासाठी अल्पवयीन मुलांचाही वापर केला जातो. तर अनेक अल्पवयीन मुलं खाणीत काम करण्यासाठी वय लपवतात.

मेघालयात खाणीत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. मेघालयात २०१८ सालच्या १३ डिसेंबर रोजी कोळशाच्या खाणीत पाणी भरल्याने १५ मजुरांचा मृत्यू झाला होता. हे सर्व मजुर 'रॅट होल मायनिंग' पद्धतीने खोदकाम करत होते.

'रॅट होल मायनिंग' करण्यावर बंदी का?

'नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल'कडून २०१४ साली या पद्धतीच्या खोदकामावर बंदी घालण्यात आली होती. २०१५ मध्येही ही बंदी कायम ठेवण्यात आली. 'रॅट होल मायनिंग' बंदीचा हा आदेश मेघालयासाठी होता. यानंतर मेघालय सरकारने या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

उत्तरकाशीतील बोगद्यात रॅट होल मायनिंग कोण करत आहेत?

पीटीआयच्या वृत्तानुसार, बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याठी उत्तराखंड सरकारने नियुक्त केलेले नोडल अधिकारी नीरज खैरवाल यांनी सांगितलं की, आता घटनास्थळी पोहोचलेले 'रॅट होल' खाण कामगार या कामातील तज्ज्ञ लोक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT