Uttarakhand Landslide Saam tv
देश विदेश

Uttarakhand Landslide: उत्तराखंडमधील केदारनाथ मार्गावर दरड कोसळली; 5 भाविकांचा मृत्यू

आज शनिवारी रुद्रप्रयाग जिल्ह्यात केदारनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Uttarakhand landslide News: उत्तराखंडच्या केदारनाथ मार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. आज शनिवारी रुद्रप्रयाग जिल्ह्यात केदारनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेत गुजरातच्या ३ व्यक्तीसहीत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी देहरादूनसहित काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. (Latest Marathi News)

दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

केदारनाथ यात्रा मार्गावर फाटा क्षेत्र येथे गुरुवारी रात्री दरड कोसळण्याची घटना घडली. दरड कोसळल्यामुळे मलब्याखाली अडकून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतामध्ये गुजरातच्या तीन आणि हरिद्वारच्या एका जणाचा सामावेश आहे. पाचव्या व्यक्तीची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे

उत्तराखंडमध्ये सहा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

उत्तराखंडच्या हवामान विभागाने शनिवार ते सोमवारी राज्यातील सहा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्टचा अंदाज वर्तवला होता. देहरादूनच्या हवामान विभागाने १४ ऑगस्ट टिहरी, देहरादून, पौडी, नैनीताल आणि उधम सिंह नगर जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला होता. प

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी म्हटले की 'काही दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी दरड कोसळली. या घटनेत एक व्यक्ती बेपत्ता झाला होता. यामुळे अनेक पुलांचे नुकसान झाले आहे. तसेच आज दुर्घटनेमुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. ही ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत'.

दरम्यान, पावसामुळे विस्कळीत झालेली राज्यातील स्थिती आणि आपत्तीमुळे बाधित झालेल्या त्वरित मदत करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT