Uttarakhand accident  saam tv
देश विदेश

चालकाला डुलकी लागली अन् कार थेट दरीत कोसळली; 6 महिलांसह 7 जणांचा मृत्यू

Uttarakhand Horror: उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यात भीषण रस्ते अपघात झाला. कलवाडी बँडजवळ वाहन खोल दरीत कोसळून सहा महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.

Omkar Sonawane

उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्हयात शनिवारी भीषण अपघात झाला. सिद्धखाल-भगलवाण गावाकडे जाणारे वाहन अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात 6 महिलांसह 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वाहन चालकाचाही समावेश आहे. तर या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. रिखणीखालच्या पुढे कलवाडी बँडजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहन अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेले आणि रस्त्यावरून थेट खोल दरीत कोसळले. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, वाहनातील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

वाहनातील प्रवासी बैणी-भुली योजनेचे अर्ज भरून आपल्या घरी परतत होते. याचदरम्यान कलवाडी बँडजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन खोल दरीत कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकही बचावकार्यात मदत करत आहेत. पोलीस आणि बचाव पथकाकडून जखमींना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या दुर्घटनेच्या परिस्थितीचा तपास करत आहेत. तसेच जखमींची नेमकी संख्या आणि त्यांची प्रकृती याबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पगारापासून बँक बॅलन्सपर्यंत...; 'या' 5 गोष्टी मरेपर्यंत कोणाला सांगू नका

डाएट न करता १८ महिन्यांत घटवलं ४० किलो वजन; १९ वर्षीय तरुणीनं कसं केलं Weight Loss?

Maharashtra News Live Update : विरोधकांना संविधान संपवायचंय - डिलिमिटेशनवर मुख्यमंत्री फडणवीस

डोकं चालवा आणि उत्तर द्या! 4, 5 की 6 फोटोमध्ये किती मांजरी आहेत?

लोकसभेच्या जागा 850 झाल्या तर राज्यसभेचं महत्त्व संपणार? घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी व्यक्त केली भीती

SCROLL FOR NEXT