Kedarnath News Saamtv
देश विदेश

Kedarnath Helicopter Accident News: मोठी बातमी! केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; पंखा लागून अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

२५ एप्रिलपासून केदारनाथ (Kedarnath) धाम यात्रा सुरू होत आहे. ज्याची जोरदार तयारी सध्या प्रशासनाकडून सुरू आहे.

Gangappa Pujari

UttaraKhand News: उत्तराखंडमधील (Uttarakhand) जगप्रसिद्ध तिर्थक्षेत्र असलेल्या बाबा केदारनाथ धाम येथे हेलिकॉप्टरच्या धडकेत एका राज्य अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. अमित सैनी असे मृताचे नाव असून ते उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशनचे (UCADA) आर्थिक नियंत्रक होते. हेलिकॉप्टरच्या पाठीमागे असलेल्या पंखा लागल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.(Helicopter News)

याबाबत अधिक माहिती अशी की, २५ एप्रिलपासून केदारनाथ (Kedarnath) धाम यात्रा सुरू होत आहे. ज्याची जोरदार तयारी सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. याच यात्रेनिमित्त तयारीची अमित सैनी हे केदारनाथ हेलिपॅडची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना त्यांची हेलिकॉप्टरच्या पंख्याला धडक बसली, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला हा अपघात झाला तेव्हा उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशनचे सीईओही तिथे उपस्थित होते.

दरम्यान, केदारनाथ धामची यात्रा २५ एप्रिलपासून सुरू होत असून, यात्रेला फारच कमी अवधी शिल्लक असल्याने प्रशासन युद्धपातळीवर तयारी करत आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी हेलिकॉप्टर सेवाही सुधारली जात आहे. उत्तराखंड पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चारधाम यात्रेसाठी 16 लाख भाविकांनी यात्रेसाठी नोंदणी केली आहे. नोंदणीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. चारधाम यात्रेसाठी नोंदणी करणाऱ्या यात्रेकरूंची संख्या सातत्याने वाढत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Viral Video Of Chain Snatching: चोरीचा हास्यास्पद प्रयत्न, पण शेवट झाला गजब, व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Chanakya Niti: 'या' ६ लोकांना कधीही आर्थिक मदत देणे टाळा, ते तुमच्या पैशाचा नाश करतात

Railway Ticket Offer : रेल्वेची भन्नाट योजना, तिकिटावर २० टक्के सूट, अट फक्त एकच

SCROLL FOR NEXT