उत्तरकाशीमधील धराली गावात ढगफुटीमुळे भूस्खलन
५ जणांचा मृत्यू, ६० लोक अजूनही बेपत्ता
खीर गंगा नदीला आलेल्या पुरामुळे राली बाजारात मोठे नुकसान
लष्कर आणि एनडीआरएफकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू
उत्तरकाशीमधील धराली गावात ढगफुटी झाली त्यानंतर झालेल्या भूस्खलनानंतर मातीच्या मलब्याखाली शेकडो घरं आणि दुकाने दबली आहेत. भूस्खलनाची घटना घडली तेव्हा सर्वत्र आरडा-ओरडा, किंचाळ्यांनी सर्व परिसर दुमदुमला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ढग फुटीची घटना घडताच डोंगराचा एक भाग पत्त्यांप्रमाणे खाली घसरला. दरम्यान ढगफुटी झाल्यानंतर खीर गंगा नदीला मोठा पूर आलाय.
या पुराचा फटका राली बाजाराला बसलाय. डोंगराच्या भाग कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार,५ जणांचा मृत्यू झालाय तर ६० जण बेपत्ता आहेत. दरम्यान युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.लष्काराचे जवान शोध कार्याला लागलेत.ढगफुटी झाल्यानंतर नाल्यातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ढग फुटताच डोंगराचा ढिगारा पुराच्या पाण्यासारखा खाली आला.
ही भयानक घटना पाहताच लोक ओरडू लागले. राली बाजार आणि आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. येथे अनेक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली आल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे मृतांच आकडा वाढण्याची शक्यता आहे. हर्षिल येथून लष्कर,पोलीस आणि एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. ढग फुटीच्या घटनेनंतर नदी नाले दुथडी भरून वाहू लागल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दुर्घटनेची पुष्टी केली असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.
तसेच भूस्खलन झालेल्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केलंय. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'धाराली (उत्तरकाशी) परिसरात ढगफुटीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित पथके मदत आणि बचाव कार्यात युद्धपातळीवर गुंतलेली आहेत.'
दरम्यान उत्तरकाशीतील धराली गावात दुपारी ढगफुटी झाल्यानंतर डोंगराचा काही भाग खाली आला. त्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले जाण्याची शक्यता आहे. व्हिडिओ पाहून ही घटना किती भयानक होती हे दिसून येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.