Rescue teams in action after a landslide trapped workers inside Dhauli Ganga power project tunnel, Uttarakhand. saamtv
देश विदेश

Landslide: मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलन, १९ कामगार अडकले

Uttarakhand Landslide: उत्तराखंडमध्ये एक मोठी दुर्घटना घडलीय. पिथोरागडमधील धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या आपत्कालीन बोगद्यांमध्ये भूस्खलन झाले आहे. यात एनएचपीसीचे १९ कर्मचारी अडकले असून त्यापैकी आठ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे.

Bharat Jadhav

  • पिथोरागडच्या धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलन झालं.

  • या घटनेत एनएचपीसीचे १९ कामगार अडकले.

  • ८ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

  • मुसळधार पावसामुळे रस्ता बंद झाला असून बचावकार्य सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे उत्तरखंडच्या पिथोरागडमध्ये भूस्खलनाची घटना घडलीय. पिथोरागडमधील २८० मेगावॅट क्षमतेच्या धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या सामान्य आणि आपत्कालीन बोगद्यांसमोर भूस्खलन झाले आहे. यात एनएचपीसीचे १९ कर्मचारी अडकले आहेत. भूस्खलनामुळे पॉवर हाऊसकडे जाणारा रस्ता बंद झालाय. भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचलाय. दरम्यान मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले.

हाती आलेल्या माहितीनुसार, आता १९ पैकी ८ कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. इतर ११ जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भूस्खलनामुळे मोठा मातीचा ढिगारा साचला आहे. ढिगारा काढण्यासाठी यंत्रे बसवण्यात आली आहेत. काही तासात रस्ता मोकळा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर सर्व कर्मचारी बाहेर पडू शकतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

धारचुलाजवळील इलागड परिसरातील धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या सामान्य आणि आपत्कालीन बोगद्यांकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सीमा रस्ते संघटनेच्या जेसीबी मशीन रस्ता मोकळा करण्यात गुंतल्या आहेत. सर्व कामगार सुरक्षित आहेत. उर्वरित कामगारही लवकरच बाहेर येतील. वीज प्रकल्पातून वीजनिर्मितीचे काम नेहमीप्रमाणे सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

पोलिसांनी याबाबत माहिती देताना म्हणालेत, कामगार अडकलेत. मोठ्या दगडांनी बोगद्याचे प्रवेश बंद झाले आहेत. घटनास्थळी जेसीबी मशीन पाठवण्यात आल्या असून कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात येत आहे. अडकलेले कामगार आणि कर्मचारी कंपनी आणि स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत. कर्मचाऱ्यांकडे आत पुरेसे अन्न आणि पेय देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा धक्कादायक परिणाम नक्की वाचा

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

SCROLL FOR NEXT